मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती आमीर खानने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एका कार्यक्रमात आमीर खान प्रत्यक्षात उपस्थित राहू शकला नाही, त्याने व्हिडीओ कॉन्फ्रसिंगने कार्यक्रमात सहभाग घेतला, त्यावेळी आमीर खानने ही माहिती दिली.


आपल्या खास आग्रहास्तव शाहरुख खानने या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचंही तो यावेळी म्हणाला. दरम्यान, या कार्यक्रमात मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांनी मराठीत भाषण केलं.