Aamir Khan मुलासोबत घेतोय `या` गोष्टीची चव... फोटो व्हायरल
आमिर खान आणि मुलगा आझादसोबत फोटो व्हायरल.... सोशल मीडियावर त्यांच्या खास फोटोंची चर्चा
मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ज्याप्रमाणे त्याच्या प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतो... त्याचं प्रमाणे त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील त्याला अनेकदा ट्रोल केलं जातं. आमिर खान कामात कितीही व्यस्त असला, तरी तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासाठी वेळ काढत असतो. आता देखील खुद्द आमिरच्या टीमने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
फोटोंमध्ये आमिर मुलगा आझादसोबत आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. फोटोंमध्ये आमिर आणि मुलगा आझाद रसाळ अंब्यांची चव घेताना दिसत आहेत...
फोटो पोस्ट करत अभिनेत्याच्या टीमने कॅप्शनमध्ये, 'तुम्ही स्वतःला आणि कुटुंबाला आंब्याची पार्टी दिली आहे का?....' सध्या आमिरचे मुलासोबत आंबे खाताना फोटो व्हायरल होत आहेत..
आमिरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर त्याचा काही चाहत्यांना आनंद झाला, पण काहींनी मात्र अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. कमेंटमध्ये युजर म्हणाले, 'तुमचा रोझा नाही आहे का?' अन्य युजर म्हणाला, 'आंब्याची चव यापेक्षा वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो...'
आमिरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरचं 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.. सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.