नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर खान याने चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. यामध्ये दाढी-मिशा आणि पंजाबी पगडी अशा वेषातील आमिर खानला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर आता आमिर खानचे चित्रीकरणादरम्यानचे आणखी काही फोटो समोर आले आहेत. आमिर खान सध्या हिमाचल प्रदेशात ‘लाल सिंह चड्ढा’चे शुटिंग करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आमिर खान स्थानिक लोकांना भेटला. या लोकांनी आमिरसोबत फोटोसेशन केले. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आमिर खानने डोक्यावर एक टोपी घातल्याचे दिसत आहे. त्याची लांब दाढीही तशीच आहे. मात्र, यापूर्वी आमिरने ट्विट केलेल्या पंजाबी व्यक्तीपेक्षा हा लूक पूर्णपणे वेगळा आहे. 


‘लाल सिंह चड्ढा’हा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. टॉम हॅक्स आणि रॉबिन राईट यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. आता अद्वैत चंदन ‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शन करत आहेत. तर अतुल कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.