बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान. आमिर खान कायमच आपला अभिनय असो वा दिग्दर्शन तो उजवाच ठरलेला आहे. ऑस्कर नॉमिनेटेड सिनेमा 'लगान' वरुन हे त्याने स्पष्ट केलं आहे.  वयाच्या 60 जवळ आलेल्या आमिर खानकडून आजही प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. असं असताना गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड, सिनेमांपासून दूर जाण्याचं बोलत असल्याचं कानावर पडत होतं. पण आता आमिर खानने एका पॉडकास्टमध्ये बॉलिवूड सोडायचंय असं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट चॅप्टर 2 मध्ये आगामी एपिसोडमध्ये अभिनेता आमिर खान येणार आहे. यामध्ये आमिर खानने स्टारडम ते आपल्या सिनेमांपर्यंत सगळ्या गोष्टी अतिशय तपशीलवार शेअर केल्या आहेत. एवढंच नव्हे तर या व्हिडीओत त्याने आपण लाइमलाइटपासून दूर राहणार असून अभिनय सोडण्याचा निर्णय घेत असल्याचा इशारा दिला आहे. 


काय म्हणाला आमिर 



मला सिनेमांपासून लांब राहायचं आहे, असं आमिर म्हणाल्यावर रिया चक्रवर्तीने तू खोटं बोलत तर नाहीस ना. तेव्हा आमिर खानला रिया म्हणाली की, तुला लाय डिक्टेर टेस्टमधून जावं लागंल. आमिर खानने करीना कपूर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमानंतर ऍक्टिंगपासून ब्रेक घेतलं आहे. याविधानावरुन आमिर खान बॉलिवूडमधून दूर जाणार आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 


मी परफेक्शनिस्ट नाही... 


आमिर खानला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखलं जातं. पण आमिर खान म्हणतो की, मी परफेक्शनवर विश्वास ठेवत नाही तर माझा विश्वास हा मॅजिकवर आहे. या चर्चेदरम्यानच आमिर खान मला सिनेमांपासून दूर जायचंय असं म्हणतो. 


भावूक झाला आमिर खान 


आमिर खान आणि रिया दोघंही या पॉडकास्टमध्ये अतिशय भावनिक मुद्यांवर बोलताना दिसतात. एक क्षण असा आला जेव्हा आमीर खान भावूक झाला. यावेळी त्याने सांगितल की, थेरपीच्या माध्यमातून त्याने आयुष्याचं एक दुसरं पर्व सुरु करुन स्वतःला संधी दिली आहे. रियाशी संवाद साधताना तो अतिशय भावूक झाल्याचं म्हटलं आहे.