मुंबई : अभिनेता आमिर खान सोशल मीडियापासून खूप दूर राहतो आणि त्याचं छोटसं कुटुंबही सोशल मीडियापासून अंतर ठेवतं. जरी आमिरची मुलगी आयरा दररोज चाहत्यांना स्वतःबद्दल माहिती देत ​​असते. मात्र आमिर आपलं वैयक्तिक आयुष्य लोकांच्या नजरेपासून दूर ठेवतो. नुकताच अमिर त्याचा लहान मुलगा आझादसोबत दिसला. यादरम्यान आझादची उंची पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत आमिर आपला मुलगा आझाद खानसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये या दोघांनीही मास्क लावले आहेत. आमिरने ब्लॅक जॅकेट घातला होता, तर आझाद पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला. त्याचबरोबर दोघांनीही चष्मा घातला आहे. या फोटोमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आझादची उंची. आझादची उंची खूप वेगाने वाढली आहे आणि ज्या वेगाने त्याची उंची वाढत आहे, लवकरच तो आपल्या वडिलांपेक्षा उंच होईल यात काही शंका नाही.



2011मध्ये झाला जन्म 
आझाद आता नऊ वर्षांचा आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तो दहा वर्षांचा होईल. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव यांनी सांगितलं होतं की, आझाद राव खान सरोगसीच्या माध्यमातून जन्मला आहे. आमीरला पहिली पत्नी रीना दत्तपासून मुलगा जुनैद व मुलगी आईरा ही दोन मुलं आहेत.