मुंबई : आमिर खानला महाभारतावर सिनेमा करण्याची इच्छा होती. त्याचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. आपल्या 'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान' या सिनेमानंतर आमिर महाभारतावार आधारित फिल्म सिरीजला सुरूवात करेल. या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमाची निर्मिती देशातील सर्वात मोठे बिजनेसमन मुकेश अंबानी करत आहेत.


ट्वीट करुन बातमीला दुजोरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेंड एनलिस्‍ट रमेश बाला यांनी ट्वीट करुन या बातमीला दुजोरा दिला आहे. या फिल्म सीरीजसाठी १००० कोटींहुन अधिकचे बजेट असेल. या जबरदस्त बजेटसह हा भारतीय सिनेमांमधील सर्वात मोठा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे.


रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार हा सिनेमा प्रसिद्ध हॉलिवूड सीरीजच्या 'द लॉड्स ऑफ द रिंग' आणि 'गेम ऑफ थ्रॉन्‍स' यांच्या प्रॉडक्शन व्हॅल्यूवर आधारीत असेल.



 'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त


आपल्या बर्थडे निमित्त मीडियाशी संवाद साधताना आमिरने सांगितले की, तो सध्या 'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान' वर काम करत आहेत. या सिनेमाचे शूटिंग जोधपूरमध्ये सुरु आहे. यात अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अमिताभ बच्चनही असतील. विजय कृष्ण आचार्य या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा १८३९ मध्ये प्रकाशित फिलिप मीडोज टेलरचे पुस्तक ‘कनफेशंस ऑफ ए ठग’वर आधारीत आहे. 


१००० कोटींचे बजेटमुळे सर्वत्र चर्चा


सध्या १००० कोटींचे बजेट असलेल्या महाभारत फिल्म सीरीजमुळे सर्वत्र चर्चा रंगू लागल्या आहेत. रिपोर्टनुसार, सिनेमाची संहिता पाहून दिग्दर्शक तीन ते पाच फिल्म सीरीज बनवण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर महाभारताची रुपरेखा लिहिण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेखकांची मदत घेतली जाईल.