लेकीसाठी आमिर खानची भावूक पोस्ट
बापाच्या पाऊलावर लेकीचं पाऊल
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या तिच्या लेकीसाठी चर्चेत आहे. आमिरची लेक इराने वडिलांच्या पाऊला पाऊल ठेवलं आहे. आमिर इराकरता भरपूर खूष असून त्याचा तिचा खूप अभिमान वाटत आहे.
थिएटर प्रोडक्शन 'युरिपिडिस मेडिया' Euripides MEDEA मधून इरा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. आमिरने शनिवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलीसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे.
'इरा, मला तुझा अभिमान आहे.' अशी पोस्ट आमिरने आपल्या इंस्टावर शेअर केली आहे. इरा एका ग्रीक नाटकाचं दिग्दर्शन करत असून हचल किच यामध्ये भूमिका साकारत आहे.
हे नाटक भारतासह जगभरात दाखवण्यात येणार आहे. या नाटकाचं प्रिमीअर डिसेबर 2019 ला होणार असून सारिकाच्या नौटंकीसा प्रोडक्शन कंपनीमार्फत होणार आहे. यामध्ये आमीरचा मुलगा जुनैद खान देखील काम करताना दिसणार आहे.
'मी सिनेमाच्याऐवजी नाटकाला दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला यामागे काही खास कारण नाही', अशी माहिती इराने दिली. मला या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. मी या अगोदर बॅकस्टेजवर देखील काम केलं आहे. नाटकाचा मंच पाहिला आहे, म्हणून विचार केला की यामधूनच सुरूवात करू.