नवी दिल्ली : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान याच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये रिलीज होताच 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाने कोट्यावधींची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच सिनेमाने १०० कोटी आणि चौथ्या दिवशी २०० कोटींचा आकडा पार केला होता. मात्र, आता सातव्या दिवशी 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाने ३०० कोटींचा आकडा गाठला आहे.


२० जानेवारी रोजी चीनमध्ये झाली होती रिलीज


गेल्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी 'सिक्रेट सुपरस्टार' हा सिनेमा रिलीज झाला होता. रिलीज झाल्यापासूनच या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. 


'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाने ७ दिवसांत केलेल्या कमाईची आकडेवारी सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली आहे.



'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाला मिळत असलेली लोकप्रियता पाहता चीनमध्ये आमिर खानच्या चाहत्यांची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे. तसेच हा सिनेमा प्रेक्षकांनाही आवडत आहे.


१५ कोटींच्या बजेटमध्ये बनला सिनेमा


'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमात जायरा वसीमने मुख्य भूमिका केली आहे. या सिनेमात जायराने इंसिया नावाच्या मुलीची भूमिका केली आहे. हा सिनेमा १५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.