...म्हणून मुंबई महानगरपालिकेने तातडीने केली आमिर खानच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट
देशभरात ५,६६,८४० कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २,१५,१२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना या धोकादायक विषाणूची झळ बॉलिवूडला देखील बसताना दिसत आहे. अभिनेता आमिर खानच्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहेत. खुद्द आमिरने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आले आहे. आता फक्त अभिनेत्याच्या आईची कोरोना चाचणी बाकी आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने तातडीने घेतलेल्या कृतीसाठी आमिरने आभार देखील मानले आहेत.
दरम्यान, सध्याच्या घडीला देशभरात ५,६६,८४० कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २,१५,१२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,३४,८२२ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
सध्याच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि दिल्लीत सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौराही केला होता.