मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि डायरेक्टर आनंद एल राय यांनी आपल्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा केली. चित्रपटाचे नाव 'ZERO'असून, हा चित्रपट या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2018च्या 21 तारखेला रिलिज होणार आहे. पण, या चित्रपटाचे नाव ZEROच का ठेवले याबाबत एक खुलासा समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांच्या मनात हाच विचार आहे. की चित्रपटाचे नाव ZERO असे का? चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय यांनी नुकतेच या प्रश्नाचे उत्तर दिले. आनंद एल राय यांचे म्हणणे असे की, आम्ही ZERO कधीच सेलिब्रेट करू इच्छितो. आम्ही आपल्यात जे अपूर्णता असते ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो. एखादी गोष्ट पूर्ण होण्यात जी मजा आहे त्यापेक्षा कितीरी मजा ती पूर्ण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या संघर्षात आहे. त्यामुळे आपण सर्वजण झिरो आहोत. आपली सुरूवात झिरोतूनच होते.


पुढे आनंद एल राय म्हणतात, 'आम्ही सद्या चित्रपट निर्मितीच्या मध्यांतरावर आहे. शाहरूख या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारत आहे. शाहरूखची फ्रेम हाच शाहरूखचा यूएसपी आहे आणि तो जोरदार काम करतो, असेही राय यांनी म्हटले आहे.