Aaradhya Bachchan new Hairstyle : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची लेक आराध्या लोकप्रिय स्टारकिड्पैकी एक आहे. त्यामुळे ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आराध्याला घेऊन खूप प्रोटेक्टिव्ह आहे असं म्हटलं जातं होतं. त्याशिवाय तिच्या हेअरकटवरून देखील तिला ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा आराध्याचं कपाळ कधी पाहायला मिळेल असे अनेकांनी ऐश्वर्याला सुनावलं होतं. इतकंच नाही तर फक्त तिचा हेअर कट बदलला तरी चालेल असे म्हटले होते. आता आराध्याचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे. तिच्या शाळेतील काही फोटो समोर आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आराध्या सोशल मीडियावर नसली तरी देखील तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून तिचं फॅन पेज देखील आहेत. नुकताच आराध्याचे काही फोटो समोर आले असून हे तिच्या शाळेतील गणेशोत्सवाचे आहेत. या फोटोमध्ये गणपती बाप्पाला निरोप देताना दिसत आहे. या कार्यक्रमात आराध्यानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून लाल रंगाची ओढणी आहे. तर तिच्या मागे एक मुलगा असून तो माइकवर गाताना दिसत आहे. तर एका फोटोत आराध्या तिच्या शाळेतल्या इतर मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. तर या फोटोंमध्ये आराध्याचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. तिनं पोनीटेल बांधली आणि हेअर बॅन्ड लावला आहे. 


गणपती बाप्पाची सजावट


काही फोटोंमध्ये आराध्या गणपती बाप्पाच्या आजूबाजुला फुलांनी सजावट करताना दिसत आहे. आराध्या फुलांची सजावट करताना खूप सुंदर दिसत आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. थोडक्यात तिचा हा लोक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 



आराध्याचं सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. तिच्या शाळेतील कार्यक्रमांचे फोटो तर चांगलेच व्हायरल होतात. काही काळापूर्वी तिचा हिंदी दिवस निमित्तानं तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील तिची हिंदी ऐकल्यानंतर सगळ्या चाहत्यांना फार आनंद झाला होता. 


हेही वाचा : World Cup आधी विराट-अनुष्काची Good News, लवकरच होणार आई-बाबा?


अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये अमिताभ यांच्या प्रतिक्षा बंगल्यात लग्न केले. तर 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. आराध्याचा जन्म झाल्यापासून ऐश्वर्या तिला सगळीकडे सोबत घेऊन फिरते. ऐश्वर्या आराध्यासोबत अनेक फोटो शेअर करताना दिसते. आराध्यासोबत लिप किस करतानाच्या फोटोवरून ऐश्वर्याला खूप ट्रोल करण्यात आलं होते.