Aaradhya Bachchan Video : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राज बच्चनसोबत तिची लेक आराध्या ही नेहमीच दिसते. काही दिवसांपूर्वी त्या दोघी दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म अवॉर्ड्स अर्थात SIIMA अवॉर्ड्समध्ये दिसले. ऐश्वर्यानं पुरस्कार जिंकल्यानंतर स्टेजवर बोलत असताना या कार्यक्रमाक सहभागी होण्यासाठी आराध्याचे आभार मानले. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत आराध्या एका व्यक्तीचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून ऐश्वर्यानं दिलेल्या संस्कारांची स्तुती होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SIIMA पुरस्कारात ऐश्वर्याला मणिरत्म यांच्या ‘पोन्नियिन सेलवन 2’ मध्ये त्यांच्या भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी ऐश्वर्या अभिनेता चियान विक्रमचा हात धरून स्टेजवरून खाली आहे. तर आईला मिळालेल्या या पुरस्कारानं आराध्या खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. तिची आई जशी स्टेजवरून खाली उतरली, ती लगेच आईकडे धावत गेली आणि तिला मिठी मारली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

त्यानंतर दुसरा एक व्हिडीओ समोर आला ज्यात त्या दोघी नंतर त्यांच्या जागेवर बसायला जाणार तेव्हाच तिथे 62 वर्षीय अभिनेता डॉ शिवा राजकुमार चियान विक्रमला भेटण्यासाठी तिथे येतात. त्यांना पाहून ऐश्वर्या देखील तिथेच थांबली आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागली. तेव्हा आराध्याशी हात मिळवण्यासाठी डॉ शिवा राजकुमार यांनी त्यांचा हात पुढे केला. मात्र, अमिताभ बच्चन यांची नात आराध्यानं सगळ्यात आधी हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि मग त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतला. तर शिवा यांनी देखील तिला आशीर्वाद दिला. या दरम्यान, ऐश्वर्याला आराध्यानं केलेल्या या कृत्यावर गर्व झाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोण आहे शिवा राजकुमार?


शिवा राजकुमार ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसले आहेत. सगळ्यात शेवटी ते ‘जेलर’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. 


हेही वाचा : KBC 16: स्पर्धक थेट जया यांना 'बेंच' म्हणाली, तर अभिषेकला... अशी होती बिग बींची प्रतिक्रिया!


आराध्या बच्चनचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना खूप आनंद झाला. सोशल मीडियावर नेटकरी या सगळ्यावर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की बच्चन कुटुंबच नाही तर ऐश्वर्यानं तिला दिलेले संस्कार देखील आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'मुलगी तिच्या आईप्रमाणे खूप चांगल्याप्रकारे लोकांचा आदर करते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आराध्याला तिच्या आईनं चांगली शिकवण दिली आहे, एकमेकांचा सन्मान कसा करायला हवा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'किती चांगले संस्कार आहे. तिच्या आईनं तिला चांगले संस्कार दिले, अशीच मोठी होत रहा.'