मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मुलीचा म्हणजेच आराध्याचा काल वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टीत बर्थडे गर्ल आराध्याने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. फ्रॉकला मॅचिंग असा हेअरबॅण्ड लावला होता. तर निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य देखील खुलले होते. तर अमिताभ आणि अभिषेक जीन्स व झिपरमध्ये दिसत होते. ऐश्वर्याची आई वृंदा रायसुद्धा आपल्या नातीच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होत्या. मुंबईतील जेडब्ल्यू मॅरिएटमध्ये आराध्याच्या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 


पाहूया पार्टीचे खास फोटोज.







 


अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून आराध्याचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. 




२००७ मध्ये अभिषेक ऐश्वर्या विवाहबद्ध झाले आणि १६ नोव्हेंबर २०११ ला त्यांच्या आयुष्यात आराध्याचे आगमन झाले.