मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचं हे बर्थडे सेलिब्रेशन कसं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मात्र मिड डे ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वाढदिवसादिवशी बच्चन कुटुंबीय मालदीवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, श्वेता आणि तिची दोन्ही मुलं १० ऑक्टोबरलाच मालदीवला जाणार आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त ते मालदीवमध्ये आठवडाभराची सुट्टी एन्जॉय करणार आहेत. याचे संपूर्ण नियोजन अभिषेक-ऐश्वर्याने केले आहे. या वाढदिवसाची खास बाब म्हणजे आराध्याने आपल्या आजोबांसाठी खास भेटकार्ड तयार केलं आहे. वाढदिवसादिवशी ती ते त्यांना भेट देणार आहे. 


बिग बींना वाढदिवशी संपूर्ण वेळ फक्त आपल्या कुटुंबाला द्यायचा आहे आणि मुंबईत राहून हे शक्य झालं नसतं. म्हणूनच ऐश्वर्या- अभिषेकने त्यांच्यासाठी मालदीव ट्रीपचा प्लॅन केला आहे. गेल्या वर्षी अभिषेक बच्चनचा ४० वा वाढदिवससुद्धा बच्चन कुटुंबीयांनी मालदीवमध्ये साजरा केला होता.