आरोह वेलणकर लवकरच अडकणार लग्नबंधनात
लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे.
मुंबई : लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे.
अनेक घरामध्ये लगीनघाई सुरू आहे. मग यामधून सिनेसृष्टीदेखील कशी अपवाद ठरेल ?
प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर , सागरिका घाटगे अशी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत.
'रेगे' या चित्रपटातून भेटीला आलेला आरोहण वेलणकरदेखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आरोहणने फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
आरोहण हा मूळचा पुण्याचा आहे. लवकरच तो अंकिता शिंगवी या त्याच्या मैत्रिणीसोबत लग्नबंधनात अडकला आहे. या दोघांची भेट ज्या दिवशी झाली त्या दिवसाची खास आठवण शेअर करत त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. अंकिता देखील पुण्याची आहे. पण ती चित्रपटसृष्टीतील नाही.
आरोह वेलणकर रेगे, घंटा अशा मराठी चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आला होता.