Aashiqui गर्ल अनू अग्रवाल इतक्या वर्षांनी सर्वांसमोर; Reality Show मध्ये तिच्यासोबत इतकं वाईट का घडलं?
सध्या रिअॅलिटी (Reality Show) शोंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होण्याऐवजी ते शोच वादाचा विषय ठरत आहेत. यामध्ये आता Singing Reality Show इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) चाही समावेश झाला आहे.
Anu Aggarwal on Indian Idol 13: सध्या रिअॅलिटी (Reality Show) शोंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होण्याऐवजी ते शोच वादाचा विषय ठरत आहेत. यामध्ये आता Singing Reality Show इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) चाही समावेश झाला आहे. स्पर्धक, परीक्षक आणि आता या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्या कलाकारांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कळत आहे. नुकतंच या शोमध्ये 'आशिकी' (aashiqui) फेम अभिनेत्री अनू अग्रवालनं हजेरी लावली होती. अभिनेता (Rahul Roy) राहुल रॉयसुद्धा यावेळी तिच्यासोबत दिसला. एक काळ गाजवणाऱ्या aashiqui चित्रपटासाठी इंडियन आयडॉलचा खास भाग समर्पित करण्यात आला होता. (aashiqui fame actress Anu Aggarwal expresses her unhappiness With Indian Idol 13)
अनूनं आळवला नाराजीचा सूर
अनू अग्रवाल आणि राहुल रॉय या कार्यक्रमात आले आणि अनेकांनाच या चित्रपटाचा काळ आठवला. पण, असं असतानाच या अभिनेत्रीनं मात्र कार्यक्रमाबाबत नाराजीचा तीव्र सूर आळवला आहे. एका मुलाखतीदरम्यान अनूनं तिला आलेला वाईट अनुभव सर्वांपुढे मांडला.
हे पाहिलं का? - Saif Ali Khan च्या पतौडी पॅलेसची झलक; दुर्दैवानं या संपत्तीवर त्याला हक्कच नाही, का पाहाच
'मी राहुल रॉयच्या शेजारीच बसले होते. पण, जेव्हा या शोचा भाग प्रसारित झाला तेव्हा मात्र मला त्यातून वगळण्यात आलं होतं. मी एक स्वाभिमानी आणि स्वत:ला सावरत पुढे आलेली महिला आहे. कार्यक्रमात मी स्पर्धकांच्या मनातील गोष्टी ऐकत त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. पण, मी जे काही प्रोत्साहनपर वक्तव्य केलं होतं ते मात्र लोकांपर्यंत पोहोचू दिलं नाही', असं अनू म्हणाली.
मी एक संन्यस्त महिला...
आपण एक संन्यस्त महिला असल्याचं म्हणत यामुळं कोणताही Ego Problem आला नाही असंही तिनं स्पष्ट केलं. 'मी कार्यक्रमात खूप काही बोलले होते. पण, त्यातलं काहीच प्रेक्षकांना दाखवण्यात आलं नाही. मी हिंदीतच संवाद साधला होता', असं म्हणत कार्यक्रमाची टीम आपल्याशी असं का वागली हे जाणून घेण्यात काहीच रस नसल्याचं अनूनं स्पष्ट केलं. आपण सदर कार्यक्रमाच्या वाहिनीला किंवा एडिटरलाही यासाठी दोषी मानत नसल्यातं म्हणत तिनं या प्रकरणाला पूर्णविराम दिला.