Saif Ali Khan च्या पतौडी पॅलेसची झलक; दुर्दैवानं या संपत्तीवर त्याला हक्कच नाही, का पाहाच

सैफनं नुकत्याच शेअर केलेल्या त्याच्या जाहिरातीमध्ये Pataudi Palace चा दाखवण्यात आला आहे. 

Updated: Nov 18, 2022, 10:47 AM IST
Saif Ali Khan च्या पतौडी पॅलेसची झलक; दुर्दैवानं या संपत्तीवर त्याला हक्कच नाही, का पाहाच title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफ हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या राजेशाही जीवनासाठीही ओळखला जातो. सैफ हा एक नवाब आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सैफनं  त्याच्या 'हाऊस ऑफ पतौडी' ( House Of Pataudi) या नावानं एक ब्रँड सुरु केलं आहे. या ब्रँडच्या जाहिरातीसाठी सैफनं पतौडी पॅलेस निवडला आहे. या जाहिरातीच्या निमित्तानं प्रेक्षकांना पतौडी पॅलेसची (Pataudi Palace) एक झलक पाहायला मिळाली आहे. 

सैफच्या पतौडी पॅलेसमध्ये काय काय आहे पाहा -

सैफनं 'मिंत्रा'च्या एका जाहिरातीसाठी त्याच्या पतौडी पॅलेसची झलक दाखवली आहे. ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये हा पॅलेस दाखवण्यात आला आहे. कारंज्यांपासून पॅलेसमध्ये असलेलं भव्य झुंबर आणि क्लासिक असं इंटेरिअर पाहायला मिळत आहे. पॅलेसमधील दोन्ही भिंती जुन्या पेंटिंग्ज, पेंटिंग्स, लाकडी वस्तु आणि काचेच्या कॅबिनेटनं आहेत. गुलाबी रंगाचे सोफे आणि इतर भव्य वस्तू पाहायला मिळत आहे.' (Step inside Saif Ali Khan s majestic Pataudi Palace with beauty in every corner Watch the video) दरम्यान, पतौडी पॅलेस यावर सैफचा काही हक्क नाही आहे. 

हेही वाचा : Drishyam 2 : कलाकारांनी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकूण व्हाल थक्क

दरम्यान, 2017 साली दिलेल्या एका मुलाखतीत सैफ त्याच्या राजेशाही जीवनाबद्दल आणि घराण्याबद्दल बोलला होता. राजघराण्यात जन्म घेतल्यानंतर सैफ कसा मोठा झाला त्याला कोणत्या गोष्टी शिकवण्यात आल्या या विषयी सांगितले. 'पैशाच्या बाबतीत, माझ्या पालकांनी मला कधीही पॉकेटमनी म्हणून खर्चाला पैसे दिले नाहीत. माझे पालनपोषण सामान्य मुलांसारखेच झाले. मी कधीच नवाब नव्हतो. ते चित्रपटांमध्ये मिळालेलं एक बिरुद आहे. माझे वडील (मंसूर अली खान पतौडी) शेवटचे नवाब होते आणि त्यांनीदेखील स्वतःला कधी नवाब म्हणवून घेतलं नाही.' 

दरम्यान, सैफ अली खान हा लवकरच 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. यातील सैफचा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले होते. यामुळे रावणाचा लूक बदलणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे असे म्हटले जात आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.