मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप दिवसांपासून चर्चेत आहे. ती क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. ही गोष्ट जग जाहिर आहे. त्यांनी त्यांचं नातं कधी अधिकृत केलं आहे पण लग्नाबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. याबाबत कोणाला विचारालं असता तर, ते या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आथिया आणि राहुलचा रोमान्स सोशल मीडियावरही खूप पाहायला मिळतो. दोघंही एकमेकांच्या पोस्टवर लाईक-कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करतात.   या दोघांचं प्रेम पुन्हा एकदा सोशल मीडियावर समोर आलं आहे. आता ते कसं ते आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.


खरंतर, अथियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक अतिशय गोंडस फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती गोल टोपी घातलेली दिसत आहे. ज्यामध्ये तिने तिचे डोळे झाकल्याचं दिसत आहे.  एकंदरीत अथिया खूपच क्यूट दिसत आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः तिची पोस्ट इथे पहा.



आता अथियाच्या इतक्या सुंदर फोटोवर कमेंट करण्यापासून राहुल स्वतःला कसं रोखू शकतो. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत त्याने लिहिले, "क्यूटेस्ट हॅट चोर." याचबरोबर अथियाच्या या फोटोवर तिचे चाहते आणि मित्रमंडळीही खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.