सलमानची बहिण अर्पिता होणार तिसऱ्यांदा आई; बेबीबंप व्हिडिओ पाहून सारेच हैराण
सध्या बॉलीवूडमध्ये लग्न सराई सुरु असतानाच दुसरीकडे प्रेग्नेंसीच्या बातमीनेही सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मुंबई : लमान खानची बहीण अर्पिता खान आणि पती आयुष शर्मा पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे. अर्पिता आणि आयुष जवळपास ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अर्पिता आणि आयुष ८ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले. अर्पिता आणि आयुष यांचा १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये हैदराबादमध्ये विवाहसोहळा पार पडला. लव्हयात्री चित्रपटातून आयुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सध्या बॉलीवूडमध्ये लग्न सराई सुरु असतानाच दुसरीकडे प्रेग्नेंसीच्या बातमीनेही सगळीकडे खळबळ उडाली आहे. दीपिका कक्करनेही नुकतीच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. दुसरीकडे अर्पिता खानबद्दल बोलायचं झालं तर ती आधीच दोन मुलांची आई आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा पाहून तिच्या तिसऱ्या प्रेग्नंसीच्या बातम्याही चर्चेत आहेत.
आयुष शर्माने पत्नीला सांभाळलं
अलीकडेच एका कार्यक्रमात अर्पिता खान आयुष शर्मासोबत दिसली. अर्पिता ब्लॅक लेहंग्यात खूपच ग्लॅमरस दिसत होती. ती ज्या प्रकारे चालत होती त्या प्रकारे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती पायऱ्यांवरून उतरू लागताच ती थोडीशी संकोचली, इतक्यात आयुष शर्मा पुढे आला आणि तिचा हात धरून प्रेमाने तिच्यासोबत चालू लागला.
आयुष शर्माने 2014 मध्ये अर्पिताशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत, मुलगा आहिल आणि मुलगी आयत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्पिताच्या बेबी बंपने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या कमेंट करत आहेत. याशिवाय आयुष शर्मालाही खूप ट्रोल केलं जात आहे. आयुष शर्माने अर्पितासोबत लग्न केल्यानंतर त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. हे लग्न त्याने प्रसिद्धी मिळावी म्हणून केलं असल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे.
आयुष शर्मा आणि अर्पिताची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. जेव्हा अर्पिताने आयुष शर्माची पहिल्यांदा सलमान खानशी ओळख करून दिली आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे असं सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण तो त्याच्याच जिममध्ये प्रॅक्टिस करायला यायचा आणि सोहेल खान त्याच्यासोबत एक चित्रपट करणार होता. सलमान खानला आयुषबद्दल कळताच त्याने त्याचवेळी त्याला आणखी एका चित्रपटाची ऑफर दिली. सलमान त्याच्या भाच्यासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमानच्या चित्रपटांच्या सेटवर अनेकदा आहिलला पाहण्यात आलं आहे.