`मला कधीच...`, सलमान खानच्या बॅनर खाली चित्रपट न करण्यावर मेहुण्यानं सोडलं मौन
Aayush Sharma : आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या बॅनर खान काम न करण्यावर सोडलं मौन
Aayush Sharma : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्मा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'रुसलान' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आयुषचा हा चित्रपट या महिन्यात म्हणजेच 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला घेऊन आयुष शर्मा खूप उत्सुक आहे. सध्या आयुष हा त्याच्या संपूर्ण टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्या लॉन्च दरम्यान, आयुष शर्मानं एसकेएफ म्हणजेच 'सलमान खान फिल्म्स लेबल' च्या अंतर्गत काम करण्यावर स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
आयुषनं चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याशिवाय त्यानं एसकेएफ बॅनर खाली नसलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. याविषयी देखील आयुषनं वक्तव्य केलं आहे. "चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास हा खूप स्लो होता. मी सलमान खानच्या एसकेअफसोबत काम करण्याची माझी कधीच इच्छा नव्हती. माझ्या करिअरच्या पाच वर्षांमध्ये स्वत: ला प्रत्येक भूमिकेत झोकून देण्याचा प्रयत्न मी केला आणि मी ते केलं देखील. जेव्हा 'लवयात्री' नंतर 'अंतिम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मला माझ्या भूमिकेत फिट होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला", असं आयुष म्हणाला.
आयुष शर्मानं सलमान खानच्या बॅनरपासून लांब होण्याविषयी सांगितलं की "आज जेव्हा केव्हा तुम्ही घरातच्या बॅनर किंवा बिझनेसपासून वेगळं होऊन काम करतात तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही कितीही खराब काम केलं तरी कुटुंबातील निर्माते आणि दिग्दर्शक मला पुन्हा कास्ट केलं. सध्या फक्त माझ्या कुटुंबासोबत काम करण्याचा माझा असा कोणताही हेतू नव्हता."
हेही वाचा : नीलम कोठारीनं 'या' कारणामुळे सोडलेली चित्रपटसृष्टी! इतक्या वर्षांनंतर आता केला खुलासा
आयुषनं पुढे सांगितलं की "मी एक अभिनेका आहे आणि मला कामाची भूक आहे. मी तेवढ्याच उत्सुकतेनं जितके चित्रपट करता येतील तितके करण्यासाठी सज्ज आहे."
अॅक्शन चित्रपट करण्याची इच्छा
आयुषनं त्याला अॅक्शन चित्रपट आवडत असल्याचे देखील सांगितलं. "मला लहानपणापासून अॅक्शन चित्रपट आवडायचे. लंडनमध्ये एक रोमॅन्टिक गाणं करणं माझं स्वप्न होतं आणि 'लवयात्री' मुळे ते पूर्ण झालं. मग 'अंतिम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला हे जाणवलं की मी पण अॅक्शन करायला हवं, कारण अॅक्शन चित्रपट करणं माझं स्वप्न होतं."