मुंबई : बिग बॉसच्या 16 (Bigg Boss 16) व्या सीझनमध्ये सध्या अब्दु रोजिक (Abdu Rozik) हा कंटेस्टंट प्रेक्षकांचे भरभरून मन जिंकत आहे. अब्दू हा 19 वर्षांचा असुन आपल्या गोंडस आणि मजेदार शैलीने सर्वांना हसवतोय. दरम्यान अब्दू रोजिक (Abdu Rozik) सध्या त्याच्या गोल्ड शूजमुळे चर्चेत आला आहे.हे त्याचे शुज आणि त्याची किंमत पाहून कटेंस्टंटना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमकी या गोल्डन शुजची किंमत किती आहे ते जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस 16 (Bigg Boss 16)  च्या आगामी भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये टीना दत्ता, अंकित गुप्ता आणि गौतम हे अब्दुचे (Abdu Rozik) गोल्डन शूज पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. अब्दू रोजिक जेव्हा त्याच्या या शुजची किंमत सांगतो, तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. मग प्रत्येकजण अब्दू रोजिकचे शूज हिसकावण्याची स्पर्धा करतात. या दरम्यान अब्दू रोजिक त्याच्या शूजला धोका असल्याचे पाहून, ते एका ब्रीफकेसमध्ये लपवताना दिसत आहेत. 


गोल्डन शुजची किंमत किती?
अब्दू रोजिक (Abdu Rozik) जेव्हा इतर कंटेस्टंना त्याच्या शूजची किंमत 40 हजार डॉलर (32 लाख 86 हजार) असल्याचे सांगतो, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सर्व त्याचे शुज चोरी करायला लागतात. 


दरम्यान अब्दू रोजिकने (Abdu Rozik) लहानपणी खूप गरिबी पाहिली. आर्थिक विवंचनेमुळे अब्दूच्या कुटुंबीयांना त्याच्यावर रिकेट्सचा उपचार करता आला नाही. याचा परिणाम अब्दुच्या उंचीवर आणि शारीरिक विकासावर झाला. पण आज अब्दु रोजिक करोडोंमध्ये कमावतो आणि टांझानियाचा सुपरस्टार गायक आहे.


तसेच 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये टांझानियन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किली पॉल (Kili Paul) अब्दू रोजिकला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला होता. किली पॉल  (Kili Paul) बॉलिवूडच्या गाण्यांवर रील्स बनवत प्रसिद्धी झोतात आलेला आहे.