Mangesh Kulkarni: आभाळमाया, वादळवाटसारख्या अनेक अजरामर शीर्षकगीतांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मंगेश कुलकर्णी यांच्या निधनाने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. गीतकाराबरोबरच पटकथाकार म्हणूनही त्यांनी लिखाण केले आहे. मराठीबरोबरच हिंदीतही त्यांनी पटकथालेखन केले आहे. शाहरुख खानच्या गाजलेल्या येस बॉस या चित्रपटाच्या पटकथालेखनाची जबाबदारीही मंगेश कुलकर्णी यांनी सांभाळली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगेश कुलकर्णी यांनी त्यांच्या लेखणीने मराठी सिनेसृष्टी आणखी समृद्ध केली. आभाळमाया आणि वादळवाटच्या शीर्षकगीतांमुळं त्यांच्या लोकप्रियेत आणखी वाढ झाली. आजही ही गाणी वाजली की मराठी प्रेक्षक जुन्या आठवणीत हरवून जातो. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शाहरुख आणि जुही चावलाची मुख्य भूमिका असलेला आवारा पागल दिवाना सिनेमात त्यांनी लेखक म्हणून काम केले. तसंच, 2017मध्ये आलेली फास्टर फेणेचे प्रोड्युसर आणि लेखक होते. 


असं रचलं आभाळमाया गाणं 


जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरे तो आभास, आभाळमायाचे हे बोल अजूनही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतात. मंगेश कुलकर्णी यांनी आभाळमाया या गाण्याचे बोल बसमध्ये असताना सुचले. कुलकर्णी यांनी एकदा मुलाखतीत सांगितले होते की, बसमधून प्रवास करत असताना आभाळमायाचे शीर्षकगीत सुचले. मात्र, लिहिण्यासाठी कागदच नव्हता. त्यानेळी त्यांनी तिकिटावर गाण्याच्या ओळी लिहली. अशोक पत्नी यांनी या गाण्याला संगीत दिले होते. सुरुवातीला मालिकेच्या निर्मात्यांना शीर्षकगीत आवडलं नव्हतं. मात्र, विनय आपटे यांनी हेच गाणं फायनल करायचं असं सांगितले. आज आभाळमायाचे गाणे अनेकांच्या मनात रुंजी घालत आहे. 


मंगेश कुलकर्णी यांनी 1993 मध्ये मराठी चित्रपट लपंडावपासून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही आपलं नशीब अजमावलं. त्यांनी गुलाम ए मुस्तफा नावाच्या चित्रपटाचे लेखन केले. 1997मध्ये हा चित्रपट रिलीज झाला यात नाना पाटेकर आणि रवीन टंडन मुख्य भूमिकेत होते. 


मंगेश कुलकर्णी यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक गाण्यांची रचना केली. कुलकर्णी यांचे शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.