`दारुडा, ठरकी, बोलण्याच्या लायकीचा...` सलमान खानवर लोकप्रिय गायकाचे गंभीर आरोप
Abhijeet Bhattacharya: बी टाऊनचे सिंगर अभिजीत भट्टाचार्य आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहे. या मुलाखतीत सलमानबद्दल अपशब्द काढून हिट ऍण्ड रन प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
Abhijeet Bhattacharya On Salman Khan: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य अनेकदा त्यांच्या गाण्यांमुळे तसेच स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. 1000 हून अधिक गाणी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायकाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान आपल्या कारकिर्दीबद्दल, तसेच इंडस्ट्रीतील काही स्टार्सबद्दल सांगितले, ज्यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांचीही नावे आहेत. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी सलमानबद्दलच्या अप्रत्यक्षपणे काही कटू गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना राग येऊ शकतो.
मुलाखतीदरम्यान अभिजीत यांनी सलमानला दारुडा म्हणत निशाणा साधला. अभिजीत म्हणाले की, सलमानबद्दल बोलण्यासारखे काही नाही. सलमानच्या हिट अँड रन प्रकरणावरील त्याच्या याआधीच्या विधानांबद्दल त्याला विचारले असता त्याने आपण सलमानला कधीही पाठिंबा दिला नाही, असे स्पष्ट केले. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर अभिजीत भट्टाचार्यला सलमान खानबद्दल विचारण्यात आले, ज्यावर तो म्हणाला, 'ज्यांच्याबद्दल मी बोलतो किंवा चर्चा करतो त्यामध्ये सलमान खान येत नाही'. मग त्यांनी शुभंकरला हा विषय बदलायला सांगितला.
अभिजीत सलमानबद्दल काय म्हणाले?
पुढे अभिजीत भट्टाचार्य म्हणाली की शाहरुख खान 'वेगळ्या स्तराचा' असून त्याच्याशी जे ही संबंध आहेत तो केवळ कामाशी संबंधित आहे. हिट-अँड-रन प्रकरणात सलमानला त्याच्या मागील टिप्पण्या आणि समर्थनाबद्दल विचारले असता त्याने ते नाकारले. अभिजीतने आपण सलमानला कधीही सपोर्ट केला नसल्याचे स्पष्ट केले. त्याने एवढेच सांगितले होते की, जर कोणी रस्त्यावर झोपले तर कोणीतरी निष्काळजी व्यक्ती त्यांच्यावर असा धावून जाऊ शकतो. गायक म्हणाला, 'मी त्याला साथ दिलीस का? कधीच नाही. मी म्हणालो होतो, आपण रस्त्यावर झोपू...'
सलमानला दारुड्या म्हटले
तो म्हणाला, 'मी त्याला कधीच पाठिंबा दिला नाही. मी म्हणालो की जर तुम्ही रस्त्यावर झोपलात तर मद्यधुंद ड्रायव्हर तुमच्यावर गाडी टाकून चिरडू शकतो. या आधी तुम्ही लोकांना ट्रकने चिरडल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. लोक रस्त्यावर झोपतात, आता फूटपाथही सुरक्षित नाहीत. जर तुम्ही रस्त्यावर झोपलात तर एक मद्यपी येईल, तुम्हाला चिरडून निघून जाईल. या सगळ्यात मी कशाला गुंतू?'. त्यांची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर युझर्स देखील आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
मग सलमानसाठी गाणी का गायली?
जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने सलमान खानसाठी 'टन टाना टन टन' आणि 'चुनरी' ही गाणी का गायली? तर अभिजीत म्हणाला की, तो कोणासाठी गातो हे कधीच विचारत नाही. पुढे त्याने सांगितलं की, 'उद्या तू चित्रपट बनवशील आणि मला गाण्यास सांगशील. मी माझे काम करून परत येईन. मी कोणासाठी गातोय हे मला कसे कळेल?'.