लाइमलाइटपासून का दूर राहिला देशाचा पहिला `इंडियन आयडल`?
अभिजीतच्या अनेक गर्ल्स फॅन्स चाहत्या
मुंबई : प्लेबॅक सिंगर अभिजीत सावंत बुधवारी आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. रिऍलिटी टीव्ही शो 'इंडियन आयडल'च्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता अभिजीत सावंत. यामधूनच अभिजीतने आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. अभिजीत विजेता झाल्यानंतर त्याच्या करिअरची सुरुवात चांगली झाली. मात्र अभिजीत आज गायब झाला आहे. तो लाइमलाइटपासून दूर आहे.
७ ऑक्टोबर १९८१ मध्ये मुंबईच्या शाहूनगरमध्ये त्याचं शिक्षण झालं. याच काळात त्याची संगीताशी सुर जुळले. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने आपलं संपूर्ण लक्ष संगीताकडे वळवलं. इंडियन आयडल जिंकल्यानंतर 'अभिजीत' नावाचं अल्बम लाँच केलं. त्याचप्रमाणे याचवर्षी त्याने 'आशिक बनाया आपने' या सिनेमाकरता देखील पार्श्वगायन केलं.
अभिजीत विजेता झाल्यानंतर त्याने अनेक सिनेमांत गाणं गायलं. मात्र गेल्या अनेक काळापासून तो सिनेसृष्टीशी आणि गायन क्षेत्रापासून लांब आहे. २००९ मध्ये 'लॉटरी' सिनेमात काम केलं होतं. मात्र तो सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तो 'तीस मार खां' सिनेमातही दिसला. अक्षय कुमार स्टारर हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही.
वेळेनुसार अभिजीतने गाण्याकडे दुर्लक्ष करत इतर गोष्टीत काम बघायला सुरूवात केली. स्प्रेमिंटच्या जाहिरात काम केलं तसेच टीव्ही शो सीआयडीमध्ये देखील काम केलं. अभिजीत टीव्ही शो नच बलिएमध्ये रिऍलिटी शोमध्ये दिसला. करिअरमध्ये वेगवेगळे पैलू चाचपडल्यानंतर अभिजीत आता या सिनेसृष्टीपासून दूर आहे.