अभिषेकला `या` कारणासाठी रोज मागतो ऐश्वर्याची माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
अभिषेकनं एका मुलाखतीत केला होता खुलासा...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्या दोघांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यात ऐश्वर्या ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
अलीकडेच ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील एक किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी हे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबद्दल बोलत आहेत.
अभिषेक रोज झोपण्यापूर्वी ऐश्वर्याची माफी मागतो, असं म्हटलं जातं. आता अभिषेक रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐश्वर्याची माफी का मागतो हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. अभिषेक म्हणाला की, 'मी रोज ऐश्वर्याची माफी मागून झोपतो', याचं कारण अभिषेक बच्चनने सांगितलं की, 'प्रत्येक नात्यात छोटं मोठं भांडण होऊ शकतं तर ते भांडण कधी कधी घटस्फोट किंवा नातं तुटण्यापर्यंत पोहोचतं.'
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यातही अशीच एक गोष्ट झाली होती, ज्यामुळे दोघांनी हा निर्णय घेतला की, रोज रात्री झोपण्यापूर्वी दोघंही एकमेकांनी त्यांच्या चुकीची माफी मागतील. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी ते उठतील तेव्हा त्याची सुरूवात नव्यान होईल.
अलीकडेच अभिषेक बच्चननं एक गोष्ट उघड केली की, 'जेव्हाही पती-पत्नीमध्ये मतभेद होतात तेव्हा सर्वप्रथम माफी मागणारा अभिषेक असतो, ऐश्वर्या नाही.' अभिषेक म्हणाला की, 'ऐश्वर्या स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही, त्यामुळेच नातं टिकवण्यासाठी अभिषेक अनेकदा चूक न करता माफी मागतो.'