मुंबई : बी-टाऊनची सगळ्यात लाडकी जोडी म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन. लग्नाच्या 15 वर्षांनंतरही त्यांचं नातं नवीन असल्यासारखं भासतं.  पालक झाल्यानंतरही या कपलने नेहमीच एकमेकांना समान महत्त्व दिलं आहे आणि म्हणूनच त्यांना 'पॉवर कपल' म्हटलं जातं.  ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चन ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिला आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा चर्चेत असते कारण तिने लग्नानंतर सिनेमांमध्ये जास्त काम केलं नाही मात्र तरीही ती खूप प्रसिद्ध आहे. तिचा पती अभिषेक बच्चन अनेकदा तिच्यासोबत दिसतो. 2007 मध्ये तिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. हे कपल एकमेकांसोबत खूप आनंदी आहे.


अभिषेक बच्चन हा बॉलिवूडचे सुपरहिट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. अभिषेक बच्चनने आजपर्यंत अनेक चित्रपट केले पण बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नाही. पण, 2004 मध्ये आलेल्या धूम या चित्रपटाने जादू केली ज्यामुळे तो लोकप्रिय झाला. यानंतर लोक त्याला खूप पसंती देऊ लागले आणि त्याने 2007 मध्ये ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केलं.


ऐश्वर्या राय बच्चनने  2008 मध्ये एनडीटीव्ही दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही एकमेकांची मजा घेताना दिसतात . या व्हिडिओत अभिषेकने त्यांच्या हनिमूनच्या दिवशी पलंग कसा तोडला तो किस्सा ऐश्वर्याने सांगितला.


हनिमूनला अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायची गंमत करण्यासाठी बेडचे सगळे स्क्रू सैल केले होते आणि थोड्या वेळाने ऐश्वर्या त्या बेडवर बसली. पण स्क्रू सैल केल्यामुळे ती बेडवरुन पडली आणि तो बेडही तुटला. अभिषेकने केलेल्या गंमतीमुळे तिने त्याच्यासोबत २ दिवसाचा अबोला धरला होता.


ऐश्वर्या राय बच्चनने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. ऐश्वर्या राय बच्चनने 1999 मध्ये "प्यार हो गया" या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ऐश्वर्या राय बच्चनने 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास'  यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे.


ऐश्वर्या रायचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगळूर, कर्नाटक, भारत येथे झाला. ऐश्वर्याच्या वडिलांचं नाव कृष्णराज राय असून ते व्यवसायाने मरीन इंजिनीअर आहेत आणि आईचे नाव वृंदा राय आहे, त्या लेखिका आहेत.  


ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलू आहे, याशिवाय तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषांचे ज्ञान आहे. ऐश्वर्या रायचे 7 वी पर्यंत शिक्षण हैद्राबाद, आंध्र प्रदेश येथे झालं. पुढे तिचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं.  अभ्यासासोबतच तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येत राहिल्या आणि तिने मॉडेलिंगही केलं.