ऐश्वर्याच्या वाढदिवशी अभिषेकनं असं काय केलं? की घटस्फोटच्या चर्चांना मिळाली हवा
Abhishek Bachchan-Aishwarya : ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी अभिषेक बच्चनने असं काही केलं की याची कोणालाच अपेक्षा नव्हती. नेमकं काय घडलं?
Abhishek Bachchan-Aishwarya : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही यांच्या नात्यात दुरावा आल्याचे अनेक दिवसांपासून म्हटले जात आहे. ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी अभिषेक बच्चनने असं काही केलं की याची कोणालाच अपेक्षा नव्हती. नेमकं काय घडलं? आता चाहत्यांना तेव्हा झटका बसला जेव्हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अभिषेकनं ऐश्वर्याला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या नाही. खरंतर अभिषेक हा दरवर्षी ऐश्वर्यासाठी खास पोस्ट शेअर करताना दिसतो. एकीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेकनं ऐश्वर्यासाठी पोस्ट शेअर न करणं हे अनपेक्षित होतं. आता हे पाहून नेटकरी अभिषेकला ट्रोल करत आहेत. त्यात आता यावरून अनेकांनी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या असल्याचं म्हटलं आहे.
काल म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचा 51 वा वाढदिवस होता. वाढदिवासनिमित्तानं तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे जुने फोटो शेअर केले होते. त्यामुळे अभिषेक देखील काही पोस्ट शेअर करेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, त्यानं असं काही केलं नाही. नात्यात येणारा दुरावा पाहता सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
हेही वाचा : 'सलमानला फोन करून अंडरवर्ल्डनं दिली होती धमकी'; सोमी अलीचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, अभिषेक बच्चनचं नाव सध्या अभिनेत्री निमरत कौरशी जोडण्यात येत आहे. असं म्हटलं जातं की दसवीं चित्रपटाचं शूटिंग करत असताना अभिषेक आणि निमरत जवळ आले. त्यानंतरच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आला आहे. या सगळ्या चर्चा सुरु असतानाच अभिषेक आणि ऐश्वर्या दोघं बऱ्याच काळापासून एकत्र स्पॉट झाले नाहीत. याशिवाय काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या एका कार्यक्रमात स्पॉट झाली होती. त्यावेळी तिनं तिच्या साखरपुड्याची अंगठी घातली नव्हती. त्यामुळे सगळीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. याशिवाय अभिषेकनं देखील एकदा त्याच्या साखरपुड्याची अंगठी घातली नव्हती आणि तेव्हा पासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यात किती तथ्य आहे आणि अभिषेक आणि ऐश्वर्या खरंच विभक्त होणार आहेत का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण त्या दोघांच्या चाहत्यांना त्यांचं विभक्त होणं हे अपेक्षित नाही.