Somy Ali on Salman Khan Getting Call from Underworld : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीही सतत त्याच्याविषयी अनेक खुलासे करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिनं म्हटलं होतं की लॉरेन्स बिष्णोई हा सलमान खानपेक्षा चांगला वाटतो. त्याशिवाय तिनं अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. आता तिनं सांगितलं की सलमान खानला अंडरवर्ल्डकडून धमकी देणारे फोन आल्याचा खुलासा केला होता. हा तेव्हाचा काळ आहे जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते.
न्यूज एजेंसी IANS शी बोलताना सोमी अलीनं खुलासा अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडविषयी बोलताना सांगितलं. जेव्हा तिला विचारलं की 90 च्या दशकात दाऊद इब्राहिमसोबत बॉलिवूडचे संबंध असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा तिनं सलमानचे डॉनसोबत काही संबंध आहेत याविषयी ऐकलं होतं का? तर सोमीनं सांगितलं की 'मी त्याविषयी खूप काही ऐकलं होतं पण कोणी काही स्पष्ट सांगितलं नव्हतं किंवा थेट दाऊदचं नाव घेतलं नव्हतं. ना कोणी छोटा शकीलविषयी काही सांगितलं. लोक फक्त त्याला अंडरवर्ल्ड म्हणायचे.'
सोमीनं पुढे सांगितलं की 'दिव्या भारती माझी सगळ्याच चांगली मैत्रिण होती. बंगळुरुमध्ये आंदोलनाची शूटिंग करताना आम्ही खूप जवळ आलो होतो. मी दिव्याला विचारलं की अंडरवर्ल्ड काय आहे? तर तिनं विचारलं की माफिया काय आहे हे तुला माहितीये? मी म्हटलं की अमेरिकेत इटॅलियन माफिया आहे. दिव्यानं सांगितलं की अंडरवर्ल्ड आणि माफिया सारखंच आहे.'
सोमीनं पुढे दावा केला की "सलमान खानला लॅन्डलाइवर धमकी देणारे कॉल यायचे. मी सलमानसोबत त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तीन वर्ष राहिली. एकदा मला आमच्या बेडरूमच्या लॅन्डलाइनवर कॉल आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं माझं अपहरण करण्याची धमकी देत सांगितलं की सलमानला बोल, सोमी अलीचं आम्ही अपहरण करू."
सोमीनं पुढे सांगितलं की 'जेव्हा मी सलमानला याविषयी सांगितलं तर तो घाबरला. पण त्यानं ती स्थिती सांभाळली. पण त्यानं मला कधी सांगितलं नाही की त्यानं कसं सगळं हॅन्डल केलं. जेव्हा त्याला विचारलं की तिनं कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का की अंडरवर्ल्डमधून ती व्यक्ती कोण होती जिनं सलमानला फोन केला होता. तर सोमीनं उत्तर दिलं की मी सलमानशी याविषयी दोन-तीनवेळा विचारलं, पण त्यानं उत्तर दिलं. हे चांगलं आहे की तुला या सगळ्या गोष्टींविषयी जितकं माहित नसेल तितकं चांगलं आहे.'
पुढे या मुलाखतीत सलमान खान त्याच्या एक्स गर्ल फ्रेंड्स म्हणजेच संगीता बिजलानी आणि कतरिना कैफशी चांगले संबंध ठेवतो. पण तिच्यासोबत नाही. तर सोमीनं सांगितलं की 'कारण सलमाननं माझ्यासोबत जसा वागला तसा त्यानं दुसऱ्या कोणासोबत केलं नाही. तो माझ्याशी जितकं वाईट वागला त्याचं अर्धही तो संगीता आणि कतरिनासोबत वागला नाही.'
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.