I Want To Talk Box Office Collection Day 2: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा नुकताच 'आई वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पाहिजे तितके यश मिळताना दिसत नाहीये. 'आई वॉन्ट टू टॉक' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली. परंतु, हा चित्रपट दोन दिवसांमध्ये 1 कोटी रुपयांची देखील कमाई करू शकला नाहीये. अभिषेक बच्चनच्या या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर देशभरात बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. जाणून घेऊयात सविस्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आई वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा आणि अभिषेक बच्चनचा दमदार अभिनयाचे देखील भरपूर कौतुक होत आहे. तरी देखील या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर मिळत नाहीये. 'आई वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी देशभरात 25 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली पण आतापर्यंत या चित्रपटाने 1 कोटीचा आकडा पार केलेला नाहीये. 


दोन दिवसाची कमाई


ट्रेड वेबसाइट सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चनच्या 'आई वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाने शनिवारी बॉक्स ऑफिसवर 44 लाखांची कमाई केली. परंतु, हा प्रारंभिक अंदा आहे. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यामध्ये काही बदल होऊ शकतात. अशा प्रकारे या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 69 लाख रुपयांची कमाई केली आहे. 'आई वॉन्ट टू टॉक' चित्रपटाने अभिषेक बच्चनच्या याआधीच्या 'घुमर' चित्रपटापेक्षा खूप कमी कमाई केली आहे. अभिषेक बच्चनच्या 'घुमर' चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 1.18 कोटींची कमाई केली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

'आई वॉन्ट टू टॉक' चित्रपटाची कथा


अभिषेक बच्चनच्या 'आई वॉन्ट टू टॉक' चित्रपटाची कथा अर्जुन भोवती फिरते. ज्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. अशातच अर्जुनला अचानक माहिती होते की तो कॅन्सरने ग्रस्त आहे. त्याला जगण्यासाठी फक्त 100 दिवस उरले आहेत. यानंतर अर्जुनच्या मूत्यूची लढाई सुरु होते.