मुंबई : बच्चन कुटुंबातील सर्वात लहान आणि लाडकी मुलगी आराध्या अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची छोटी राजकुमारी आराध्याला कधी तिच्या चालण्याच्या शैलीमुळे तर कधी तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल केले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अभिषेक बच्चनने आपल्या मुलीची एका संरक्षक वडिलांप्रमाणे खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.


मुलीची खिल्ली उडवणाऱ्या अभिषेकने फटकारले


अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत ट्रोल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले आणि म्हणाले - हे कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाऊ शकत नाही आणि हे सहन केले जाऊ शकत नाही.


मी एक पब्लिक फिगर आहे, ते ठीक आहे, परंतु माझी मुलगी यातून बाहेर आहे. तुम्हाला काही बोलायचे असेल तर समोर या आणि माझ्या तोंडावर सांगून दाखवा.




बॉब बिस्वासमध्ये अभिषेक बच्चन दिसणार 


अभिषेक बच्चनबद्दल बोलायचे तर तो लवकरच बॉब बिस्वास या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो कॉन्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वासची भूमिका साकारताना दिसणार आहे. या व्यक्तिरेखेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी अभिषेकने आपले वजन अनेक किलोने वाढवले आहे.


मुलाखतीत, अभिषेकने बॉब बिस्वास बनण्याच्या त्याच्या मानसिक प्रक्रियेबद्दल सांगितले आणि भूमिकेत येण्यासाठी तो वजन वाढवण्यावर ठाम आहे. त्याने सांगितले होते की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याचे वजन 105 किलोपर्यंत वाढले होते. पण व्यक्तिरेखा खरी दिसावी म्हणून त्याला प्रोस्थेटिकचा सहारा न घेता वजन वाढवणे योग्य वाटले.