88 लाख रुपये Per Night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच

Travel : भाऊ सर्वांना नाही झेपायचं! जगातील सर्वात महागड्या रेल्वेप्रवासाचं तिकीट घ्यायला तुमचा किती पगार संपेल माहितीये? 

Nov 26, 2024, 10:32 AM IST

Travel : प्रवास... खा प्या, फिरा, झोपा, उठा, पुन्हा खा प्या आणि फिरा.... हे असंच काय ते समीकरण भटकंतीसाठी निघालेली कैक मंडळी कायम लक्षात ठेवतात. 

1/7

रेल्वेप्रवास

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

Train Travel : रेल्वेप्रवास म्हटला की काही अपवाद वगळता सहसा कायमचीच गर्दी, काही प्रवाशांची मुजोरी आणि क्वचितप्रसंगी दिसणारा ढिसाळ कारभार असं चित्र अनेकांच्या नशिबी येतं. पण, यातूनही रेल्वे प्रवास अनेकांच्याच प्राधान्यस्थानी असतो ही बाबही नाकारता येत नाही.  

2/7

प्रचंड महाग

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

भारतात काही अशाच लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, ज्या माध्यमातून दूरवरचा प्रवास करणं शक्य होतं. तर, काही अशा रेल्वेगाड्याही आहेत ज्यातून केलेला प्रवास एखाद्या राजेशाही थाटाचाच अनुभव देतो. प्रचंड महाग किमतीला या रेल्वेगाड्यांच्या तिकीटांची विक्री होते. पण, तुम्हाला जगातील सर्वात महागडी आणि तितकीच आलिशान रेल्वे आणि तिचं प्रवासी भाडं माहितीये का?  

3/7

लक्झरी ट्रेन

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

Venice Simplon Orient Express ही जगातील सर्वात महागडी लक्झरी ट्रेन असल्याचा दावा केला जातो. ही ट्रेन, एक्सक्लूसिव बेलमंड कंपनी द्वारा चालवली जाते. जाणून आश्चर्य वाटेल, पण या रेल्वेला असणारे डबे 1920 मधील रिस्टोर्ड कोच असल्याचं सांगितलं जातं.   

4/7

मार्बलची फरशी

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

मार्बलची फरशी असणारे एन्सुइट बाथरूम, 24 तासांची बटलर सुविधा, फ्री फ्लोइंग शॅम्पेन सुविधा ही या रेल्वे प्रवासाची काही खास वैशिष्ट्यं. लंडन, पॅरिस, वेनिस, प्राग, बुडापेस्ट आणि व्हिएना यांसारख्या प्रमुख युरोपीय शहरांची सफर या ट्रेननं करता येते.   

5/7

दणदणीत रक्कम

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

या ट्रेनमध्ये असणाऱ्या  L'Observatoire लक्झरी सुईटसाठी एका रात्रीसाठी तब्बल £80,000 म्हणजेच 88,00,000 रुपये इतकी दणदणीत रक्कम मोजावी लागते. हे एक खास सुईट असून, त्याला 'आर्टवर्क इन मोशन' असंही म्हटलं जातं. यामध्ये प्रायव्हेट डायनिंग रुमही उपलब्ध आहे.   

6/7

पंचतारांकित रेस्तराँ

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

Venice Simplon Orient Express नं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पंचतारांकित रेस्तराँमध्ये मिळतं तसेच पदार्थ जेवणात दिले जातात. या जेवणाचं स्वरुप Full Course Meal असं असतं. ज्यामध्ये जागतिक दर्जाची वाईनही दिली जाते.   

7/7

महागड्या रेल्वेची व्हर्चुअल सफर

Worlds most luxurious train orient Express route ticket rates and inside photos

Belmond  कंपनीकडून रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 300 किमीच्या अंतरापर्यंत कुठंही  पिकअप आणि ड्रॉप-ऑफ सेवाही पुरवण्यात येते. या ट्रेननं प्रवास करताना प्रवाशांना कमालीच्या उच्चभ्रू जीवनशैलीची जाणीव आणि एक अविस्मरणीय अनुभव घेता येतो. काय मग, कशी वाटली ही जगातिल महागड्या रेल्वेची व्हर्चुअल सफर? (सर्व छायाचित्रं सौजन्य- orient-express.com)