मुंबई : बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज म्हणजेच 5 फेब्रुवारीला त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकने आपल्या करिअरसाठी खुप मेहनत घेतली आहे. आज त्याच्या वडिलां इतके त्याच्याकडे काम नसले तरी, त्याने वेळोवेळी चित्रपटात स्वत:चा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्याचा मुलगा असल्यामुळे आपल्याला त्याचं अयुष्य सुखकर वाटत असलं तरी, त्याला त्याच्या करिअर आणि पर्सनल आयुष्यात खूप कष्ट करावे लागले आहे. त्याच्या प्रोफेशनल लाइफच्या संघर्षाबद्दल जवळपास प्रत्येकाला माहित आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींबद्दल लोकांना माहित नाही. अभिषेकला लहानपणी एक आजार झाला त्याला डिस्लेक्सिया म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या नवव्या वर्षी अभिषेकला डिस्लेक्सियाचे निदान झाले. हा विकार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. यामध्ये मुलांना वाचता येत नाही, त्यांना शब्द ओळखता येत नाहीत आणि ते वाचता किंवा बोलता येत नाहीत. असेच काहीसे अभिषेकच्या सोबत घडले होते.


तुम्ही आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट पाहिला असेल, तर या चित्रपटात दर्शिल सफारीने डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या मुलाची उत्तम भूमिका साकारली आहे. अगदी तसाच त्रास अभिषेकला ही होता.


या रोगाचे निदान त्याच्या वयाच्या नवव्या वर्षी झाले, त्यानंतर त्यावर योग्य उपचारांनंतर अभिषेकसोबत सगळं ठिक होऊ लागलं. आज त्याचे डायलॉग डिलिव्हरी ऐकून किंवा त्याला पाहून असे अजिबात वाटत नाही की, त्याला कधी असा त्रास होता.


या कारणास्तव अभ्यास मध्येच सोडला


अभिषेकचे शालेय शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल, त्यानंतर बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून झाले. त्यानंतर तो स्वित्झर्लंडमधील एग्लॉन कॉलेजमध्ये गेला. त्यांने बोस्टन विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे.


पण तो बोस्टनमधून आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतला. या मागील त्याने असे कारण सांगितले की, त्याचे वडील अमिताभ बच्चन आर्थिक अडचणीत असल्याने त्याला हे पाऊल उचलावे लागले.


2000 मध्ये अभिषेकने रेफ्युजी 'या' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने ओम जय जगदीश, जमीन, रन, युवा, धूम, बंटी और बबली, सरकार, दस, ब्लफमास्टर, गुरु, सरकार राज, दोस्ताना, दिल्ली-6, पा, रावण, बोल बच्चन, मनमर्जियां यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या ब्रीद या मालिकेने अभिषेकच्या अभिनय प्रतिभेला प्रचंड लोकप्रियता दिली. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये दहावा आणि SSS-7 यांचा समावेश आहे.