`स्टॉक मार्केट स्कॅम`वर आधारीत ``द बिग बूल`` सिनेमाचा टीझर रिलीज
हर्षद मेहताची कथा मोठ्या पडद्यावर येणार...
मुंबई : हर्षद मेहताची कथा मोठ्या पडद्यावर येणार असल्याची बातमी गेल्या वर्षीच समोर आली होती. कोरोनाचं सावट या सिनेमावर आल्याचं पाहायला मिळालं, या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. पोस्टर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हा टीझर अजय देवगननं सोशल मीडियावर शेअर करत 'द बीग बूल' असं कॅप्शन दिलं आहे. या टिझरमधून सिनेमाची रिलीझ डेट देखील घोषित करण्यात आली आहे. कुकी गुलाटी दिग्दर्शित 'द बीग बूल' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येताच, सोशल मीडियावर या सिनेमाचा बोलबाला होताना दिसत आहे.
या सिनेमाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. अभिषेक बच्चन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 1992 मध्ये भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर आधारित आहे.
हर्षद मेहता हे शेअर बाजारातील एक मोठं नाव होतं. हर्षदने अनेक आर्थिक गुन्हे केले होते, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. हे या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा ८ एप्रिलला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांची बायोग्राफी असलेला क्राईम थ्रिलर सिनेमा स्टॉक मार्केट स्कॅमवर आधारित आहे. हा सिनेमा १९८० ते १९९० या दहावर्षामधील हर्षद मेहता यांनी केलेले आर्थिक गुन्हे दाखवणारा हा सिनेमा आहे.
या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत एलियाना डिक्रूज़ आणि सोहम शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या टीझरला अजय देवगणच्या आवाजाने सुरुवात होते. मग द बिग बूल सिनेमातील हेमंत शाह यांची भूमिका साकारत असलेला अभिनेता अभिषेकची एन्ट्री होते.