मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने तिचा असा एक व्हिडीओ शेअर केला होता. जो पाहून तिचे चाहते नाराज झाले होते. पण काही लोकांनी या व्हिडिओचा आनंदही घेतला. समुद्राच्या मधोमध मस्ती करण्याच्या स्टाईलमध्ये सनी लिओनी गेली खरी पण त्यानंतर तिच्यासोबत जे झालं याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी लिओन समुद्रात अनेकदा पडली 
सनी लिओनीने नुकताच मालदीवचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बिकिनी घालून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या दरम्यान, तिचा बॅलन्स जातो  आणि ती समुद्रात पडते आणि हे एकदा नाही तर अनेकवेळा घडतं. बरेच प्रयत्न करूनही सनीला या वॉटर स्पोर्टचा आनंद घेता येत नाही. सनीचा हा व्हिडिओ पाहून तुमचा दिवस बनून जाईल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सनीने शेअर केला सिनेमाचा पोस्टर
अलीकडेच, सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ओएमजी अर्थात ओह माय घोस्टचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. पोस्टरमध्ये सनी लिओनी निडर स्टाईलमध्ये हातात खंजीर धरलेली दिसत आहे. साऊथचा स्टार विजय सेतुपतीने चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ओ माय घोस्टमध्ये सनी लिओनी एका राणीच्या भूमिकेत दिसत आहे. ज्याच्याशी एक मोठं रहस्य जोडलं गेलं आहे.