`अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का` फेम अभिनेत्याच्या मुलीचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन
Tishaa Kumar Died : या लोकप्रिय अभिनेत्याची आणि टी-सीरिजच्या मालकाच्या लेकीचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन
Tishaa Kumar Died : अभिनेता आणि निर्माता कृष्ण कुमार यांची लेक आणि भूषण कुमारची चुलत बहीण तिशा कुमारचं कॅन्सरमुळे निधन झालं आहे. तिच्या निधनाच्या बातमीनं इंडस्ट्रीतील सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 21 व्या वर्षी निधन झालं आहे. काल 18 जुलै रोजी उपचार सुरु असताना तिनं अखेरचा श्वास घेतला.
रिपोर्ट्सनुसार, काही वर्षांपूर्वी तिशा कुमारला कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर जर्मनीत उपचार सुरु होते. टी-सीरीज के स्पोक्सनं सांगितलं की हा काळ कुटुंबासाठी खूप कठीण आहे आणि आम्ही विनंती करतो की असा वेळी कुटुंबात्या प्रायव्हसीचा विचार करा.
कोण होती तिशा कुमार?
तिशा कुमारचा जन्म 6 डिसेंबर 2003 रोजी झाला होता. तिच्या आई-वडिलांची नावं कृष्ण कुमार आणि तान्या सिंग असं आहे. कृष्ण कुमार हे गुलशन कुमार यांचे छोटे भाऊ आहेत. तर तान्या सिंग या संगीतकार अजीत सिंग यांची लेक आणि अभिनेत्री नताशा सिंग यांच्या बहीण आहेत. तान्या या स्वत: एक अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्यांनी 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आजा मेरी जान' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
टी-सीरिजच्या कार्यक्रमांमध्ये लावायची हजेरी!
तिशाविषयी कोणतीही जास्त माहिती कधी मिळत नव्हती, पण ती नेहमीच टी-सीरीजच्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगला दिसायची. तिशा अखेरीस 30 नोव्हेंबर 2023 मध्ये रोजी झालेल्या अॅनिमल या चित्रपटाच्या प्रीमियरला दिसली होती. या कार्यक्रमात पापाराझींसाठी पोज देताना दिसली.
कृष्ण कुमार यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेवफा सनम' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' हे याच चित्रपटातील गाणं आहे. त्यासाठीच सगळे त्यांना ओळखतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय ते 'लकी: नो टाइम फॉर लव', 'रेडी', 'डार्लिंग', 'एयरलिफ्ट' और 'सत्यमेव जयते' चे सह-निर्माते होते.