मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. सर्वत्र वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर टीका होत आहे. शिवाय या ट्रोलींगला कंटाळून काही स्टारकिड्सने आपले ट्विटर अकाऊंट देखील डिलीट केले आहेत. त्याचप्रमाणे स्टारकिड्सच्या चित्रपटांवर डिसलाईकचा भाडिमार होत आहे. दरम्यान घराणेशाहीवर अनेक कलाकारांनी आपले मत मांडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री प्राची देसाईने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. सध्या  तिचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मध्ये ती बॉलिवूड हा कौटुंबीक व्यवसाय असल्याचं ती बोलत आहे. 



'बॉलिवूड हा एक कैटुंबिक व्यवसाय आहे. सर्व बॉलिवूड मंडळी मुंबईत राहतात त्यांची मुलं स्टार होतात. त्यानंतर त्यांची मुलं येतात ती स्टार होतात. हा न थांबणारा व्यवसाय आहे.' असं ती या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. 


‘कसौटी जिंदगी की’ मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या प्राचीने २००६ साली ‘कुसम से’ या मालिकेतून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.