मुंबई : बॉलिवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खानच्या अडचणी आता कमी होताना दिसत आहे. दरम्यान आमिर खान विरूद्ध दाखल करण्यात आलेली फौजदारी याचिका (Criminal petition) फेटाळण्यात आली आहे.  छत्तीसगड हायकोर्टाकडून त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. २०१५ साली केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरून रायपूरच्या दीपक दिवानने आमिरवर याचिका दाखल केली होती. परंतु आता ती याचिका फेटाळण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर म्हणाला होती त्याची पत्नी किरणने त्याला सल्ला दिला होता की त्याने हा देश सोडावा. त्याच्या या वक्तव्यानंतर रायपूरच्या दीपक दिवानने याचिका दाखल केली होती, मात्र आता ती याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर दिपक यांनी पुनर्विचार देखील दाखल केली. 


 पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर दीवान यांनी अ‍ॅडव्होकेट अमीकांत तिवारी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी सुनावणी करताना हायकोर्टने सांगितले की, या वक्तव्यामुळे देशाची अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आहे की नाही यावर निर्णय घेण्याचे आधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही व्यक्तीला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची परवानगी नसल्याचं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं. 


दरम्यान, देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि मला त्याबाबत फार काळजी वाटते. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अतिशय चिंतेत असलेली माझी पत्नी किरणने तर मला आपण देश सोडून जाऊ या, असेही सांगितले होते, असे आमिरने दिल्लीतील रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात बोलताना म्हटले होते.