Bramhastra Move for Rs. 100: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र (Alia Bhatt and Ranbir Kapoor Film Bramashtra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त (World Cinema Day) हा चित्रपट 75 रूपयांना चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी उपलब्ध होता. (Bramhastra for 75 Rupees) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयान मुखर्जी दिग्दर्शित (Ayan Mukherji) आणि आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Allia Bhatt and Ranbir Kapoor) यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा चित्रपट 23 सप्टेंबरला 75 रूपयांत विकला गेला. चाहत्यांनी या चित्रपटासाठी मोठी गर्दी केली होती. या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला तर काहींनी या चित्रपटाला नेगेटिव्ह रिव्हयूज आले. 


आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?


परंतु आता रणबीर आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी (Good News for Alia Bhatt and Ranbir Kapoor Fans) आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त  (World Cinema Day) अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर ब्रह्मास्त्रच्या (Bramhastra) निर्मात्यांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आनंद देण्याचा निर्णय घेतला. 75 रुपयांनंतर आता प्रेक्षक नवरात्रीत म्हणजे 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर (26 September to 29 September) या कालावधीत केवळ 100 रुपयांमध्ये हा (Bramhastra For 100 Rupees) चित्रपट पाहू शकतात. होय, याबद्दल स्वतः दिग्दर्शक अयान मुखर्जीने इन्टाग्रामवर अपडेट पोस्ट केली आहे. 


अयान मुखर्जीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर (Ayan Mukherji on Instagram) हे अपडेट शेअर केले आहे. एक व्हिडिओ शेअर करताना, चित्रपट निर्मात्याने लिहिले, "ब्रह्मास्त्र हा चित्रपट आता आम्ही केवळ 100 रूपयांत उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. वर्ल्ड सिनेमा डे साठी आम्ही ब्रह्मास्त्र 75 रूपयांत प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला होता.


आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तेव्हा या चित्रपटाचा फायदा सगळ्या प्रेक्षकांना मिळाला होता आता या चित्रपटाची नवी योजना आम्ही घेऊन येतो ज्याचा सर्वांनाच चांगला उपयोग होईल अशी आम्हाला आशा आहे. असे प्रयोग सतत होत राहावेत.' अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी दिली.