Actor Died In A Plane Crash: हॉलीवूडमधील प्रसिद्धी अभिनेता ख्रिस्टीयन ओलिव्हरचं अपघाती निधन झालं आहे. कारबीबेन येथे झालेल्या विमान अपघातामध्ये ख्रिस्टीयनबरोबरच त्याच्या दोन्ही मुलींचंही निधन झाल्याचं वृत्त, बीबीसीने दिलं आहे. 'स्पीड रेसर' चित्रपटासाठी ओळखला जाणाऱ्या ख्रिस्टीयन सेंट व्हेनिकंटवरुन सेंट लुसिया येथे जाताना हा अपघात घडला.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यानंतर विमान थेट समुद्रात कोसळलं.' 51 वर्षीय ख्रिस्टीयन या मूळचा जर्मन होता. ख्रिस्टीयनचं खरं नाव ख्रिस्टीयन क्लेपसर होतं. या अपघातामध्ये ख्रिस्टीयनची 10 वर्षांची मुलगी माडिटा आणि 12 वर्षीय मुलगी अ‍ॅनिक या दोघींचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त विमानाचा मालक आणि वैमानिकाचं नाव रॉबर्ट असं होतं. त्याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. रॉबर्ट हा मुळचा अमेरिकन होता.


समोर आला धक्कादायक व्हिडीओ...


हा अपघात झाला तेव्हा विमानाचे अवशेष आकाशातून समुद्रात पडतानाची दृष्य कारबीबेन बेटांवरील काही लोकांनी कॅमेरामध्ये टीपली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच अपघातानंतर मदतीसाठी पोहचलेल्या टीमचा ख्रिस्टीयन ओलिव्हरचा मृतदेह सापडल्यानंतर तो समुद्रातून बाहेर काढतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



सोशल मीडियावर अनेकांनी या तिघांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. घडलेली घटना फारच दु:खद असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. ख्रिस्टीयन आणि त्याच्या दोन्ही मुलांचा फोटोही व्हायरल झालेत. 



पाहूयात काही व्हायरल पोस्ट...


1)



2)



3)



विमानामध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.