मुंबई : बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने अभिनेत्री स्मिता पाटील यांनी रुपेरी पडदा गाजवला. काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील यांचे निधन झाले. स्मिता पाटील यांचा अभिनय दर्जेदार होताच. पण त्यासोबत त्या कलाकार म्हणून उत्कृष्ठ होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिता पाटील या शिवाजीराव पाटील यांच्या कन्या होत. शिवाजीराव पाटील हे आमदार होते. तसेच स्मिता पाटील यांची आई विद्याताई पाटील यादेखील समाजसुधारक होत्या.


प्रतीकने आईचा चेहरा देखील पाहिला नाही 


स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बाळाला जन्म दिल्यानंतर स्मिता पाटील यांचं निधन झालं. स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना प्रतीक बब्बर नावाचा मुलगा आहे. प्रतीक बब्बरला आपल्या आईचा चेहरा देखील पाहता आला नाही. 


काही वर्षात‌ त्यांना आजाराची लागण झाली आणि त्यानंतर त्यांनी हे जग सोडले. त्यांच्या मृत्यूनंतरही परदेशातही त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. कारण त्यांनी काम केलेले चित्रपट जगभरात गाजत होते. त्यांनी अमिताभ सोबत काम केलेले सगळे चित्रपट हिट राहिलेले आहेत.


स्मिता पाटील यांना अभिनेत्याचा इशारा


स्मिता पाटील यांना सावध राहण्याचा इशारा त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षे आधी दिला होता. या अभिनेत्याचे नाव अन्नू कपूर असे आहे. अन्नू कपूर यांनी याआधी अनेक चित्रपटात काम केले आहे. चित्रपटांमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यांनी सनी देओल, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांबरोबर त्यांनी लोकप्रिय अशा भूमिका केल्या. छोट्या पडद्यावर देखील ते करत असलेले अनेक‌ शो प्रचंड गाजले आहेत.


सुहाना सफर हा त्यांचा कार्यक्रम प्रचंड गाजला. या कार्यक्रमात त्यांनी अनेक सेलिब्रिटींनी बोलावले होते. त्याचप्रमाणे रेडिओवर देखील त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित होत असतात. तर यामध्ये देखील ते आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करत असतात.


काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील आणि अन्नू कपूर विमानामध्ये एकत्र प्रवास करत होते. अन्नू कपूर यांना भविष्य पाहता येते. अनेकांचे भविष्य ते पाहत असतात. विमान प्रवास करत असताना स्मिता पाटील यांना अन्नू कपूर यांनी भविष्य सांगितले होते की, भविष्यामध्ये तू सांभाळून राहा.


तुला मोठा धोका होऊ शकतो, असे त्यांनी आधीच सांगितले होते आणि काही वर्षातच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला होता. अन्नू कपूर यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली.