मुंबई : सोनी टीव्हीचा लोकप्रिय गुन्हे तपासावर आधारित कार्यक्रम 'क्राइम पेट्रोल'च्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हा शो होस्ट करणारा टीव्ही-सिनेमा जगतातील हुशार अभिनेता अनूप सोनीने हा शो सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या या निर्णयानंतर सर्वजण हैराण आहेत. अनूप सध्या नोटीस पिरियडवर आहे. याचा अर्थ तो अजून काही भागांमध्ये दिसू शकणार आहे. 


अभिनय करायचाय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात अनूपला विचारले असतास होय. 'मी शो सोडतोय. ८ वर्षे हा खूप मोठा वेळ आहे. आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता. या सर्वात मी अभिनय मिस्ड करतोय.  मी आधी अभिनेता आहे. गेल्या ५ वर्षांपासून मी अभिनय केला नाहीए. त्यामूळे सिनेमा आणि शो'ज करण्याचा माझा विचार असल्याचे अनूपने सांगितले.'


स्वत:वर प्रयोग करायचे आहेत 


अनूपच्या अनुपस्थितीची कमी प्रेक्षकांना नक्की जाणवेल. या संदर्भात अनूपला विचारण्यात आले. त्यावर तो म्हणतो, हो. मला माहितेय. प्रेक्षक नाराज होतील. पण प्रेक्षकांनीही माझी स्थिती समजून घ्ययावी. मी संपूर्ण जोशात प्रत्येक शो केला. पण मी माझ्याआतल्या अभिनेत्याला मारू शकत नाही. या शो'साठी माझ्या मनात नेहमी स्पेशल जागा असेल. मला अभिनेता म्हणून स्वत:वर वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. अनूपने बालिका वधू, शांति, कहानी घर घर ती मध्ये काम केलं आहे.