मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूडचे वरिष्ठ अभिनेता अनुपम श्याम यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. multiple organ failure कारणामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. अनुपम यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करायचे बंद झाल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून डायलिसिस करत होते. त्यांच्यावर मुंबईच्या लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्यामुळे टीव्ही इंड्रस्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपम श्याम यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 63 व्या वर्षी multiple organ failureमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. त्यांच्या आजारपणामुळे कुटुंबावर मोठं आर्थिक संकटही आलं होतं. त्यावेळी सोनू सूद, सिने आर्टिस्ट एसोसिएशनने त्यांना मदतीचा हात दिला होता. 


अनुपम श्याम 'मन की आवाज प्रतिज्ञा' टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. ते खऱ्या आयुष्यातही याच नावाने ओळखले जातात. 'सदरादी बेगम', 'बँडिट क्वीन', 'हजार चौरासी की माँ', 'दुश्मन', 'सत्या', 'दिल से', 'जख्म', 'प्यार तो होना ही था', 'कच्चे धागे', 'नायक', 'स्लमडॉग मिलेनियर' आणि मुन्ना सायकल सारख्या सिनेमात काम केलं आहे.