`S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन` म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजर
Arjun Rampal on Cheating In Relationships : अर्जुन रामपालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Arjun Rampal on Cheating In Relationships : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनं आजवर अनेक चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन रामपालला कॅज्युअल सेक्स आणि ओपन रिलेशनशिप्सवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अर्जुन कपूरनं सांगितलं की आजकाल लोकांसाठी धोका देणं एक अॅडिक्शन प्रमाणे आहे.
अर्जुन रामपालनं नुकतीच रणवीर अल्लाबादियाच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यावेळी सेक्स आणि रिलेशनशिपवर बोलताना अर्जुन रामपाल हसला आणि म्हणाला, "मला सेक्स आवडतं. मला वाटतं की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात सेक्स हे खूप महत्त्वाचं आहे पण त्याहून जास्त काही महत्त्वाचं असेल तर ते एकाच पार्टनरसोबत राहणं. जेव्हा कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही बेड शेअर करतात, शारीरिकरित्या त्याच्यासोबत संबंध बनवता, तेव्हा तुमच्या न कळत मोठ्या प्रमाणात एनर्जी एक्सचेंज होते. तुम्ही त्या व्यक्तीकडून काय घेता यावर देखील महत्त्वाच असत. ते तुमच्या DNA मध्ये कुठे तरी जातं."
पुढे अर्जुनला मल्टीपल रिलेशनशिप्स आणि पार्टनरवर चीटिंग करण्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, "हे एक व्यसन आहे, ही एक सवय आहे जी लोकांनी स्वत: साठी तयार केली आहे. मी अशा अनेक लोकांना ओळखतो ज्यांचं वैवाहिक आयुष्य हे खूप चांगलं असून त्याते ते आनंदी आहेत, तरी त्यांना दुसऱ्या स्त्रीची किंवा ते ज्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आहेत त्याची गरज असते. ते स्वत: त्यांच्या वैवाहिक आयुष्याला Happy Marriage बोलतात, मला माहित नाही कसं, ते जे काही असेल, ते अनेकदा या नात्यांना फ्लिंग (काही काळासाठीच एकत्र असणं) किंवा काहीच नाही असं म्हणतात, पण ते काही नाही अस असू शकत नाही ना. खरंतर हे व्यसन आहे, त्यामुळे हे तुम्हाल खाली खेचत राहणार."
हेही वाचा : 'आम्ही पुरुष मूर्ख असतो!' घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनंतर अर्जुन रामपालनं व्यक्त केली खदखद
अर्जुन पुढे म्हणाला की 'हे कोणत्या व्यक्तीसाठी योग्य नाही. मी स्वत: वर कठोर असलेली व्यक्ती होतो, स्वत: ला त्रास देण्यात मी खूप काळ व्यर्थ केला आहे. त्यामुळे स्वत: वर कठोर होण्यापेक्षा त्याच चुका पुन्हा कशा होणार नाहीत याकडे लक्ष द्या. स्वत: ला बदलण्याचा प्रयत्न करा.'