मुंबई : विनोद आणि विनोदाचं टायमिंग हे शब्द आले, ती आपोआपच एक नाव ओठांवर येतं. हे नाव गेली कैक दशकं प्रेक्षकांना आनंद देत आहे. त्यांच्या असण्यानं कित्येकांच्या आयुष्यात सकारात्मकता आहे. असा हा कलाकार म्हणजे, अभिनेते अशोक सराफ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या पंच्याहत्तरीत असणाऱ्या या अभिनेत्यानं आजवर जी लोकप्रियता मिळवली आहे ती हेवा वाटण्याजोगी. अशा या अभिनेत्याच्या अभिनयाची अफलातून कागिरी असणारा चित्रपट म्हणजे, 'अशी ही बनवाबनवी'. (Actor Ashok saraf celebrates 75 th birthday)


33 वर्षे उलटून गेलेल्या या चित्रपटाची जादू आजही कायम. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा अभिनय पाहायला मिळाला होता.


एकाहून एक सरस कलाकार, तितकंच विनोदी कथानक अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली असं म्हणायला हरकत नाही. त्याचच उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ...(Ashi Hi Banwa Banwi)



चित्रपट प्रदर्शित होऊन आज बराच काळ लोटला असला तरीही त्यातील अनेक दृश्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मग ते धनंजय मानेने (अशोक सराफ यांनी) दुधाच्या केंद्रावर रांगेत उभं राहून चक्कर आल्याचं नाटक करणं असो किंवा, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, असं विचारणारा लक्ष्या असो. प्रासंगिक विनोद आणि त्यातून पुढे जाणारा चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’चा जीव.


या चित्रपटातील तुम्हाला भावलेलं धनंजय मानेंचं एखादं दृश्य कोणतं?