Atul Kulkarni Mahatama Gandhi Kavita: संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे सगळीकडेच रोष पत्करला जातो आहे त्यातून त्यांनी महात्मा गांधीजींच्या विरूद्ध केलेल्या विधानामुळे राजकारणही पेटून आलं आहे. सध्या या रणांगणात विरोधी पक्षांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडायला सुरूवात केली आहे. या सगळ्यात लोकप्रिय अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या एका कवितेनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अतुल कुलकर्णीची ही कविता ट्विटवरवरून शेअर केली आहे. तेच ट्विट अतुल यांनी रिट्विट करून आपल्या ट्विटर अकांऊटवरून शेअर केलं आहे. ही कविता अतुल यांनी महात्मा गांधी यांना उद्देशून रचली आहे. या 1.12 मिनिटांच्या व्हिडीओनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या कवितेची चर्चा रंगलेली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र संताप असताना अतुल यांनी ही कविता शेअर केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतुल कुलकर्णी हे उत्कृष्ट अभिनेते म्हणून आपल्या सर्वांनाच्याच परिचयाचे आहेत. राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरही ते मोकळेपणानं आणि अभ्यासू वृत्तीनं बोलताना दिसतात. त्याचसोबत आपले विचारही उघडपणे मांडताना दिसतात. सध्या त्यांच्या या ट्विटनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कवितेतून त्यांनी नेमकं काय लिहिलंय आणि या कवितेचा अर्थ आहे तरी काय? 


हेही वाचा - देखणं सौंदर्य अन् घरंदाज आई; सुलोचना दीदींची आठवण आल्याशिवाय राहावत नाही!


अतुल कुलकर्णी यांच्या या कवितेतून महात्मा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांवर मार्मिकपणे टीका करण्यात आल्याचे कळते. हे ट्विट शेअर करताना मात्र अतुल कुलकर्णी यांनी इतर कुठलाच उल्लेख केलेला नाही. रोहित पवार यांनी या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''एक संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर रचलेल्या या ओळी मनाला खूप भावल्या… मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या अशा अनेक पिढ्या मेल्या पण ‘तो’ मेला नाही आणि मरणारही नाही.. ‘तो’ आहे #गांधीविचार आणि #महात्मागांधी!'' या कॅप्शनपुढे त्यांनी अतुल कुलकर्णी यांना टॅग केले आहे. 



अतुल कुलकर्णी यांची 'सिटी ऑफ ड्रीन्स सीझन 3' ही लोकप्रिय वेबसिरिज नुकतीच जून महिन्यात प्रदर्शित झाली आहे. त्यांच्या या सिरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे या सिरिजची सर्वत्र चर्चा आहे. ही वेबसिरिजही राजकारणावर आधारित आहे. या सिरिजच्या पहिल्या दोन भागांनाही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अतुल कुलकर्णी यांनी अनेक मराठी - हिंदी आणि प्रादेशिक भाषांतील चित्रपटांतून कामं केली आहे. ते सोशल मीडियावरही एक्टिव असतात.