Bhalchandra Kulkarni Death : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड
Bhalchandra Kulkarni Death : अभिनेता भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्काबसला आहे. भालचंद्र यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी काम केलेले चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. फक्त मराठी नाही तर भालचंद्र यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Bhalchandra Kulkarni Death : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे आज 18 मार्च रोजी निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानी त्यांची सकाळी सहा वाजता निधन झाले. आता साडेअकरा वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.
भालचंद्र यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भालचंद्र यांनी आजवर 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अभिनय क्षेत्रापासून लांब होते. याकाळात भालचंद्र हे कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील एका प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या 1984 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. आजही नवरात्रीत हे गाणं नक्कीच ऐकायला येतं.
हेही वाचा : वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न! लोकप्रिय Actor च्या घरी चिमुकलीचं आगमन
भालचंद्र यांनी फक्त मराठी नाही तर कोल्हापुरात प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. भालचंद्र यांची खूप साधी राहणी होती. भालचंद्र यांनी सगळ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. प्रत्येक भूमिका ही परफेक्ट असली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करायचे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.
भालचंद्र यांनी कोणत्या चित्रपटांमध्ये केले काम!
भालचंद्र यांनी मर्दानी (1983), मासूम (1996), झुंज तुझी माझी (1992), हळद रुसली कुंकू हसलं (1991), माहेरची साडी (1991) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.