Mohit Raina Become Father : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता मोहित रैना (Mohit Raina) हा त्याच्या 'देवों के देव … महादेव' (Devon Ke Dev...Mahadev) या मालिकेतील महादेव या भूमिकेसाठी ओळखला जातो. मोहितला पालकत्वाचे सुख मिळाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मोहितनं गर्लफ्रेंड अदिति शर्मासोबत लग्न केलं. त्यांच्या अचानक दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर सगळ्यांना सुखद धक्का बसला होता. त्यांच्या सुखी संसार सुरु असताना चर्चा सुरु झाल्या होत्या की त्या दोघांच्या नात्यात अनेक वाद सुरु असून ते घटस्फोट घेणार आहेत. मात्र, त्या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे मोहितनं म्हटले होते. आता मोहितच्या आयुष्यात एका लहान पाहुण्याचे आगमन झाले आहे.
मोहितनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या घरात चिमुकलीचे आगमन झाल्याची बातमी दिली. मोहितनं त्याचा लेकीचा पत्नीचा आणि त्याचा हात असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की अशा प्रकारे आम्ही दोनाचे तीन झालो. चिमुकली तुझे या जगात स्वागत आहे. मोहितनं शेअर केलेल्या या फोटोनंतर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत अनेकांनी त्याला आणि अदितिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. (Mohit Raina Become Father)
मोहित आणि अदिति यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर पहिल्या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी कोणालाच कळू दिले नाही. ज्यावेळी त्यांनी लग्न केलं त्यावेळी मोहितनं अचानक सगळ्यांना ही गोड बातमी दिली होती. इतकंच काय तर त्या दोघांनी प्रेग्नंसीची बातमी देखील सगळ्यांपासून लपवून ठेवली होती.
हेही वाचा : Comedian Khyali Saharan: धक्कादायक! कॉमेडियन ख्याली सहारन अडचणीत, लैंगिक शोषणाचा आरोप
घटस्फोटाच्या चर्चा ज्या प्रकारे सुरु झाल्या ते पाहता मोहितनं इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्यावर उत्तर देत मोहित म्हणाला, मला खरंच माहित नाही की ही बातमी कुठून आणि कशी सुरु झाली. हे सगळं एका ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरु झालं होतं. या अफवांवर सडेतोड उत्तर देत मोहित म्हणाला की तो सध्या त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. मोहित 1 जानेवारी 2022 रोजी लग्न बंधनात अडकला होता.