अभिनेता भाऊ कदम दिसणार महाराष्ट्राची हास्यजत्रा कायक्रमामध्ये? पाहा व्हिडीओ
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रत्येक घरात अगदी न चुकता पाहिला जातो. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमाची कास्ट असलेला `एकदा येऊन तर बघा` हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रत्येक घरात अगदी न चुकता पाहिला जातो. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमाची कास्ट असलेला 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अनेक कॉमेडी कलाकार एकत्र येणार आहेत. हास्याची चौकार असलेला सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे हवा येऊ द्या हा कार्यक्रमदेखील सतत चर्चेत असतो.
या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र चाहत्यांना प्रचंड आवडतात. मात्र गेले अनेक दिवस हा कार्यक्रम बंद होणार असल्याची चर्चा होती. ज्या कार्यक्रमातून भाऊ कदम घरा-घरात पोहचला त्याच्याविषयी एक चर्चा गेले अनेक दिवस जोरदार सुरु आहे. ती म्हणजे अभिनेता हास्यजत्रामध्ये झळकणार असल्याची. त्यामुळे आम्हाला दिलेल्या मुलाखतीत त्याला याबद्दल प्रश्व विचारण्यात आला. 'एकदा येऊन तर बघा' या आगामी सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरदार सुरु आहे. याच निमीत्ताने या संपुर्ण टीमने झी २४ तासला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेता भाऊ कदमला या चर्चेवर हा प्रश्न विचारण्यात आला.
आम्हाला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदमला प्रश्न विचारण्यात आला की, भाऊ आम्ही ओंकार ला आणि तुम्हाला एकत्र बघतो. ओंकारने पुन्हा एकदा एन्ट्री घेतलीये हास्यजत्रेमध्ये आम्हाला तुम्हाला बघायला मिळणार आहे हास्यजत्रामध्ये? यावंर सगळे जोर जोरात हसू लागतात आणि भाऊ या प्रश्नाचं उत्तर न देता तो हसला आणि न्यूजरुममध्ये एकच हास्य कल्लोळ उठला. त्यामुळे जरी ही चर्चा असली तरी अद्याप तरी भाऊ या शोमध्ये दिसणार नाही यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, विनोदाची वेगवेगळी शैली असणाऱ्या भन्नाट विनोदी कलाकार मंडळींच्या एकत्र येण्यानं हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज प्रेक्षकांना खदखदून हसवणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची ट्रीट असणार आहे.
'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. या चित्रपटाविषयी लवकरच आणखी माहिती मिळणार आहे.