मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिलला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ध्रुववर ड्रग्स खरेदी करण्याची, खरेदीत सहभागी झाल्याचा आणि आरोपी मुजम्मिल अब्दुल रहमान शेखला पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप केला आहे. दोघांमध्ये या संदर्भात झालेल्या व्हॉट्सऍप चॅटवरून खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात आधी मुजम्मिल अब्दुल रहमान शेखला अटक केली. आरोपीकडून 35 ग्रॅम मेफड्रोन (M.D) जप्त करण्यात आलं. मुजम्मिलचा फोन देखील पोलिसांनी जप्त केला आहे. ज्यामध्ये त्याने ध्रुवशी ड्रग्स संदर्भात चर्चा केली आहे. 



मुजम्मिल आणि ध्रुव यांच्यात झालेल्या चॅटमध्ये कॉन्ट्राबँन्डबाबत चॅट झालं आहे. यामध्ये ध्रुव ताहिलने मुजम्मिलकडे कॉन्ट्राबँन्डसोबत अनेक ड्रग्सची मागणी केली. एँटी नार्कोटिक सेल, बांद्रा यूनिट ने   CR No. 34/2021 U/S 8(C) r/w 22 (B) NDPS कायदा 1985 च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 


एवढंच नव्हे तर ध्रुव ताहिलने ड्रग्स मागवण्यासोबतच आरोपी मुजम्मिलला बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटमधून सहावेळा पैसे ट्रान्सफर केले आहेत. तसेच ध्रुव आणि मुजम्मिल 2019 ते मार्च 2021 पर्यंत संपर्कात होते. बुधवारी ध्रुवला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे. 


दिलीप ताहिल हिंदी सिनेमातील दिग्गज कलाकार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुलाचा फोटो शेअर करून हिंट दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'माझा मुलगा ध्रुव उभरता अभिनेता.'