भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या 10 रोचक गोष्टी, तुमच्या जीवनावर होईल प्रभाव

Savitribai Phule Motivational Quotes in Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती आहे. भारतीय इतिहासात अशा अनेक महान व्यक्तींचा जन्म झाला, ज्यांनी समतावादी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले हे सुंदर व्यक्तिमत्त्व.

| Jan 03, 2025, 12:42 PM IST
1/10

सावित्रीबाई फुले कोण होत्या?

सावित्रीबाई फुले एक महान भारतीय समाज सुधारक, शिक्षिका आणि कवी होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रात झाला होता. 

2/10

सावित्रीबाई फुले यांचा विवाह

सावित्रीबाई फुले अवघ्या 9 वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. लग्नाच्यावेळी ज्योतिराव फुले यांच वय 13 वर्षे होतं. 

3/10

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीसोबत 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे पहिला मुलींची शाळा सुरु केली. तसेच त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिकेच्या रुपात समोर आले.   

4/10

18 शाळांची स्थापना

सावित्रीबाई फुले यांनी एकूण 18 शाळांची स्थापना केली. ज्यामुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं. 1851 सालापर्यंत पुण्यात 3 महिलांच्या शाळांची काळजी घेतली. जेथे 150 हून अधिक मुली शिकत होत्या. 

5/10

शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले यांनी विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे विद्यार्थिनी शाळा सोडण्याची संख्या कमी झाली. 

6/10

पहिल्या महिला आंदोलनकर्त्या

सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या शिक्षिका आणि महिला आंदोलनकर्त्या या रुपात पाहिलं गेलं. 19 व्या शतकात त्यांनी महिलांचे अधिकार आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 

7/10

समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात अभियान

सावित्रीबाई फुले यांनी अस्पृशता, बालविवाह, सती प्रथा आणि जातीवाद याच्याविरोधात सामाजिक रुढींविरोधात आंदोलन केलं. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. ज्यामुळे कन्या भ्रूण हत्या रोखली जाईल.  (हे पण वाचा - Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi Images Whatsaap Status) 

8/10

सत्यशोधक समाजाची स्थापना

सावित्राबाई फुले यांनी अशा लग्नाला प्रोत्साहन दिले जिथे पंडित, गुरुजी यांची गरज भासणार नाही. तसेच हुंडा देखील घेतला जाणार नाही. 

9/10

अस्पृशतेविरोधात संघर्ष

सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यतेविरोधात संघर्ष केला. त्यांनी आपल्या घरातील विहिर अस्पृशांसाठी खुलं ठेवलं. प्लेग या महामारीवेळी पुण्यातील लोकांसाठी एक दवाखाना देखील सुरु केला. 

10/10

स्मारक आणि सन्मान

सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 साली अखेरचा श्वास घेतला. 1988 मध्ये भारत सरकारने सावित्रीबाई यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकिट जाहीर केलं.